अमळनेर येथील गांधली पुरा भागातील वेश्या व्यवसाय बंद करण्याचे उच्च न्यायालयाचा आदेश असतांना सुरू असलेल्याने त्वरित बंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली.
सविस्तर वृत्त असे की, अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे मागील भागात वेश्याव्यवसाय अनेक वर्षांपासून सुरू आहे.पोलिसांनी अनेकदा कारवाई सुद्धा केल्या आहेत.मात्र सदर वस्तीला लागूनच नागरी वस्ती असल्याने स्थानिक नागरिकांना अनेक वाईट गोष्टींना सामोरे जावे लागत असल्याने याबाबत सामाजिक कार्यकर्ते कुदरत अली, रियाजोद्दिन शेख व शेरखान पठाण यांनी या विरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका 598/2019 दाखल केली होती.सदरील याचिकेवर उच्च न्यायालयाने सुनावणी पूर्ण करून सदर व्यवसाय पिठा कायदा १८ अन्वये कार्यवाही व अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहे.मात्र पोलीस प्रशासनाने सदर व्यवसाय बंद करण्याचे पाऊल उचलले नसल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमल बजावणी त्वरित करावी अन्यथा येत्या २६ जानेवारीला प्रांतकार्यालया समोर उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन स्थानिक नागरिकांनी अमळनेर प्रांताधिकारी मुंडेवार यांना देण्यात आले.
याप्रसंगी सहीद हाजी, आकिब शेख,अजहर अली,अलतमश शेख,अखतर अली, मोहसीन शेख,नईम पठाण आदींच्या उपस्थित होते.