राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेची प्रथम नियोजन सभा एरंडोल येथे उत्साहात संपन्न

एरंडोल प्रतिनिधी,भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून एरंडोल येथे जानेवारी 2025 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे आयोजन केले जाणार असल्याची घोषणा संविधान सन्मान परिषद राज्य समन्वय समितीचे प्रमुख तथा समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाठ यांनी आज एरंडोल येथे झालेल्या नियोजन सभेत केली.

 

या राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेला संविधान जागर चळवळीमध्ये योगदान देणारे संविधान अभ्यासक, प्रसिद्ध लेखक, साहित्यिक, विचारवंत व समाज सुधारक यांना निमंत्रित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. संविधान जागर चळवळीत काम करणाऱ्या राज्यभरातील 75 कार्यकर्त्यांना, लेखक तसेच विचारवंतांना ‘संविधान योद्धा’ म्हणून गौरवले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या 75 संविधान योद्धांच्या कार्याची माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित केली जाणार आहे. या सोबतच संविधानावर परिसंवाद व चर्चासत्राचे आयोजन केले जाणार आहे. ‘घर घर संविधान’ या अभियानाचा एक भाग म्हणून संविधान परिषदेला उपस्थित सर्वच संविधान प्रेमींना संविधानाची पुस्तिका भेट म्हणून दिली जाणार आहे.

 

भारतीय संविधानावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले जाणार असून पारितोषिक प्राप्त उत्कृष्ट निबंधांची पुस्तिका प्रकाशित केली जाणार आहे. संविधान परिषदेनिमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर केला जाणार असल्याची माहिती भरत शिरसाठ यांनी दिली.

संविधान सन्मान परिषदेच्या नियोजनाचा भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातील जिल्हा पश्चिम विभागाची पहिली सभा आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी एरंडोल येथील हिमालय कॉम्प्लेक्स हॉल मध्ये आयोजित करण्यात आली होती. समता शिक्षक परिषदेचे पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष रणजीत सोनवणे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

सभेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना भरत शिरसाठ यांनी विविध समित्यांची रचना व त्यांचे कार्य सविस्तरपणे स्पष्ट केले. सभेचे प्रास्ताविक भैय्यासाहेब सोनवणे सर यांनी केले. सत्यशोधक चळवळीचे पी. डी. पाटील सर, लक्ष्मण पाटील सर, डॉक्टर संदीप कोतकर, भारतीय बौद्ध महासभेच्या पश्चिम विभागाच्या जिल्हाध्यक्ष मंगलाताई सोनवणे, पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्त्या संगीता साळुंखे, प्रकाश तामस्वरे सर, प्राध्यापक नरेंद्र गायकवाड, साप्ताहिक लेखन मंचचे संपादक अजय भामरे,पत्रकार बापूराव ठाकरे सर, पत्रकार व लेखक सोपान भवरे सर, त्यागमूर्ती माता रमाई पुस्तकाच्या लेखिका वर्षा शिरसाठ, धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाघ, सामाजिक कार्यकर्ते संतोष तायडे, प्रतीक्षा सोनवणे इत्यादींनी आपले विचार व्यक्त केले व परिषदे संदर्भातील अपेक्षा व्यक्त केल्या. अध्यक्षीय भाषणामध्ये रणजीत सोनवणे यांनी संविधान सन्मान परिषद यशस्वी करण्याचे उपस्थितांना आवाहन केले.

जळगाव जिल्हा पश्चिम विभागाच्या संयोजन समिती प्रमुख पदी धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाघ यांची निवड करण्यात आली. धरणगाव तालुका संयोजन समिती प्रमुखपदी पी डी पाटील सर व लक्ष्मण पाटील सर, धरणगाव तालुका महिला संयोजन समिती प्रमुखपदी सविता गाडे व उषाताई बाविस्कर, अमळनेर तालुका संयोजन समिती प्रमुखपदी बापूराव ठाकरे तसेच अंमळनेर तालुका महिला विभाग संयोजन समिती प्रमुखपदी मंगलाताई सोनवणे व प्रमिलाताई ब्रह्मे, पाचोरा तालुका संयोजन समिती प्रमुखपदी संगीताताई साळुंखे, एरंडोल तालुका संयोजन समिती प्रमुख पदी प्राध्यापक नरेंद्र गायकवाड व एरंडोल तालुका महिला संयोजन समिती प्रमुखपदी सुलोचना खोब्रागडे यांची निवड करण्यात आली. एरंडोल तालुका अल्पसंख्यांक विभाग संयोजन समिती प्रमुखपदी कादर पिंजारी यांची तर एरंडोल शहर युवा संयोजन समिती प्रमुखपदी कविराज पाटील यांची निवड करण्यात आली.

सभेप्रसंगी डॉक्टर नरेंद्र तायडे, भारती ठाकरे मॅडम, चिंतामण जाधव सर, प्राध्यापक उमेश सूर्यवंशी, मुख्याध्यापक प्रवीण केदार सर, मुख्याध्यापक सुधाकर मोरे सर, मुख्याध्यापक हेमेंद्र सपकाळे सर, एरंडोल आगार कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी भगवान ब्रह्मे, बाबुराव भगत, एरंडोल आगाराचे कर्मचारी सुनील खैरनार, प्रा.आकाश बिवाल, मयूर भामरे, सतिश शिंदे सर, वंचित बहुजन आघाडी अमळनेर तालुकाध्यक्ष दाजीबा गव्हाणे, एरंडोल तालुकाध्यक्ष वाल्मीक सोनवणे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सरचिटणीस प्रमिलाताई ब्रह्मे, संघटक नलिनीताई, पंचशीला संदानशिव, जिल्हा संस्कार विभाग उपाध्यक्ष सिद्धार्थ सोनवणे, सामाजिक कार्यकर्ता अजय घोलप, शंकर शिरसाठ,कादर पिजारी,इब्राहीम पिंजारी इत्यादी मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनेचे पदाधिकारी तसेच शिक्षक वृंद एरंडोल, पाचोरा, अंमळनेर, चाळीसगाव, पारोळा, धरणगाव व चोपडा तालुक्यातून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!