*……..|| नि द र्श ने ||……..*
सुप्रीम कोर्टाच्या एससी, एसटी उपवर्गीकरण व क्रिमीलेअर निकालाच्या विरोधात उद्या जिल्हाधिकारी कार्यालय समोर होणार निदर्शने
समजा बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आरक्षण बचाव संघर्ष समितीने केले आवाहन
जळगाव प्रतिनिधी,सुप्रीम कोर्टाच्या एससी, एसटी उपवर्गीकरण व क्रिमीलेअर निकालाच्या विरोधात जळगावच्या आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने बुधवार दिनांक : २८ऑगस्ट,२०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर निदर्शने करण्यात येणार आहे. तरी एससी, एसटी प्रवर्गातील नोकरदार व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदर निदर्शनामध्ये सहभाग नोंदवावा.आपल्या आंदोलनाचा रेटा वाढविल्याशिवाय शासन व प्रशासनावर दबाव निर्माण होणार नाही. त्यासाठी सर्व एससी, एसटी बांधवांना रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. तमाम एससी, एसटी लाभार्थींना जाहीर विनंती करतो की, सदर निदर्शनाच्या वेळी आपण उपस्थित राहून आंदोलनाला बळ द्यावे, असे आवाहन आयु.मुकुंदभाऊ सपकाळे (अध्यक्ष, आरक्षण बचाव संघर्ष समिती, जळगाव) यांनी केले आहे.
………………………………….
*||आरक्षण बचाव संघर्ष समिती , जळगाव ||*