अमळनेर प्रतिनिधी,तालुक्यातील मंगरूळ येथे काही दिवसा पूर्वी बघण्यावरून झालेल्या हल्यातील सात जनां विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशन येथे रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की,दि. 28/8/2024 रोजी रात्री 08.00 वा.चे सुमारास कालिम व त्याचे काका सलीम यासीन खाटीक हे मंगरूळ येथील चिकनचे दुकानात असतांना अचनाक जवळपास सात जणांनी त्याच्या हल्ला करून गंभीर जखमी केले होते.जखमी कामिल खाटीक याला वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.कामिल यांनी दिलेल्या फिर्यादी वरून सोनु संजु बिन्हाडे डोक्यात लोखंडी रोड मारला तसेच विक्की मंगल सपकाळे व राहुल बिरहाडे यांनी काठ्यांनी मारहाण केली तर अक्षय बैसाने व रूद्र संदानशिव यांनी हातातील काठ्यांनी मारहाण करून जमिनीवर पाडले त्यानंतर रोहीत अहिरे व सागर वाघ अशांनी लाथाबुक्यांनी मारहाण करून पॅन्टचे खिशातील पैशांचे पॉकिट काढून घेतले त्यानंतर त्यांनी काका सलीम यांना सुद्धा मारहाण करून त्यांच्या खिशातुन पैसे काढुन घेतले त्यानंतर रोहित अहिरे व सागर वाघ याने आमच्या दुकानातील दिवसभरातील गल्ल्याचे सुमारे 10,000/- रूपये काढुन घेतले.दरम्यान आरडा ओरड झाल्याने गावातील लोकांनी तावडीतून सुटका केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.त्यात 1) सोनु बिन्हाडे, 2) विक्की सपकाळे, 3) राहुल बिहाडे,4) अक्षद बैसाने 5) रोहित अहिरे, 6) दर्शन बि-हाडे, 7) सागर वाघ, 8) रुद्र संदानशिव सर्व रा.अमळनेर या सर्वांचा विरुद्ध कलम 309(6),189(2),191(2),191(3),190,115,352,351(2),118(2),प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्ह्याचा तपास पो.क.संजय पाटील हे करीत आहेत.
तर दुसऱ्या फिर्यादीत सोनू बिऱ्हाडे व त्याचे मित्र जेवण करण्यासाठी जात असताना चिकन घेण्यासाठी कामील खाटीक याच्या दुकानात गेल्यानंतर भाव विचारताच कामिल याने शिवीगाळ करीत मारझोड करण्यास सुरुवात केली तर त्याचा काका सलीम खाटीक याने हातातील चाकूने सोनू याच्या वर हल्ला केला मात्र तो वाचवित असताना हाताला लागल्याने जखमी झाला .तसेच हुसेन खाटीक याने पाटीवर लोखंडी जाळी मारली.जखमी सोनू तसाच पोलिस ठाण्यात जाऊन मेडिकल मेमो घेऊन रुग्णालयात उपचारासाठी गेला.दरम्यान कामील हुसेन खाटीक, हुसेन खाटीक, सलीम खाटीक यांच्याविरुद्ध सोहित संजय बिऱ्हाडे याच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा व भारतीय न्याय संहिता 1181(1), 115(2), 352, 351(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अमळनेर उपविभागीय अधिकारी सुनील नंदवाळकर हे करीत आहेत.