अमळनेर येथील शिक्षक ,कवी,पत्रकार अजय भामरे यांना महात्मा जोतिबा फुले राष्ट्रीय फेलोशिप पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .
भारतीय साहित्य अकादमी ४० वे राष्ट्रीय साहित्यकार संमेलन ८ व ९ डिसेंबर २०२४ रोजी नवी दिल्ली येथे पार पडले.यावेळी मंचावर राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर एस.पी सुमनाक्षर, राष्ट्रीय महासचिव जय सुमनाक्षर, प्रोफेसर रतन लाल सोनागरा (अध्यक्ष स्वागत समिती), तसेच आजी, माजी मंत्री उपस्थित होते.
कवी अजय भामरे यांनी कोरोना काळात “महात्मा फुले व त्यांच्या विचारांची आवश्यकता” या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले होते. महाराष्ट्र गोवा द्वि राज्यस्तरीय स्पर्धेतही प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले तसेच त्यांच्या ‘क्रांतीलहर’ कादंबरीला बहिणाबाई सोपानदेव पुरस्कार मिळाला आहे.ते गेल्या ५ वर्षापासून ‘लेखन मंच’ साप्ताहिक पेपरच्या माध्यमातून महापुरुषांची विचारधारा मांडण्याचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.