अमळनेर प्रतिनिधी, येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज(स्वायत्त),अमळनेरचे डॉ.आर.सी.सरवदे(प्राणिशास्त्र)व डॉ.रवी बाळसकर(रसायनशास्त्र) यांना यांच्या शैक्षणीक वाटचालीसाठी सन्मानित करण्यात आले.
डॉ.आर.सी.सरवदे हे प्राणिशास्त्र विभागात गेल्या २० वर्षांपासून अध्ययन व संशोधन कार्य करीत आहेत त्यांनी आज पर्यंत २० पेक्षा अधिक युजीसी (केअर लिस्ट) मान्य संशोधन मासिकात आपले लेख प्रसिद्ध केले आहेत. केअर लिस्ट मध्ये सर्वाधिक लेख त्यांनी प्रसिद्ध केले आहेत.
त्यांना म.गा.वि कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,हर्षुल,त्र्यंबकवेश्वर,नाशिक या ठिकाणी ०९.०९.२०२४ रोजी एका राष्ट्रीय परिषदेत भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन आंतरराष्ट्रीय गुरुजन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
डॉ.रवी बाळसकर हे रसायनशास्त्र विभागात गेल्या १० वर्षा पासून कार्यरत आहेत. त्यांच्या नावे दोन पेटंट आहेत,त्यांनी आज पर्यंत विद्यापीठ अनुदान आयोग अंतर्गत दोन संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत त्यांच्या या शैक्षणिक कार्या बद्दल रसायनशास्त्र असोसिएशन द्वारे ०८.०९.२०२४ रोजी डॉ.पी.पी.माहुलीकर,डीन प्राचार्य डॉ.एस एस राजपूत,प्रा.ए एम नेमाडे,डॉ.एम के पटेल,प्रा.एम टी चौधरी,रसायनशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.गुणवंत सोनवणे यांनी विशेष पुरस्कार देऊन अभिनंदन व कौतुक केले आहे.
डॉ.आर सी सरवदे व डॉ.रवी बाळसकर यांच्या या विशेष सन्माना बद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी, कार्यउपाध्यक्ष नीरज अग्रवाल,जेष्ठ संचालक हरी वाणी,डॉ.अनिल शिंदे,योगेश मुंदडे, प्रदीप अग्रवाल,प्राचार्य तथा चिटणीस डॉ.अरुण जैन,सह चिटणीस डॉ.धिरज वैष्णव,उप प्राचार्य डॉ.विजय तुंटे, डॉ.अमित पाटील, डॉ.कल्पना पाटील,डॉ.व्ही बी मांटे,डॉ.हर्षवर्धन जाधव, डॉ.अशोक पाटील,डॉ.मुकेश भोळे,डॉ.तुषार रजाळे,डॉ.विवेक बडगुजर,प्रा.रामदास सुरळकर,प्रा.वैशाली राठोड,डॉ.माधव भुसनर,डॉ.जितेंद्र पाटील, प्रा.विजय साळुंखे,प्रा.जयेश साळवे,संदीप बिऱ्हाडे,साबीर शेख,संदीप सोनवणे यांच्या सह अन्य शिक्षक व अन्य शिक्षकेतर वृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.