अमळनेर येथील खानदेश मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र या विद्याशाखेचे सहाय्यक प्राध्यापक कपिल राजेंद्र मनोरे यांनी क.ब.चौ. उ.म.वि,जळगाव या विद्यापीठात आपले संशोधन थिसेस सादर केले.त्यांचा पीएचडी वायवा हा दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी ऑनलाइन संपन्न झाला.
त्यांचा विषय *ए स्टडी ऑफ पेशंट्स सॅटिस्फॅक्शन अँड सर्विस कॉलिटी ऑफ प्रायमरी हेल्थ केअर सेंटर इन जळगाव डिस्ट्रिक्ट* हा होता.
त्यांना *डॉ.विना पी भोसले*(सहयोगी प्राध्यापिका, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट,जळगाव) यांनी मार्गदर्शन केले.
हा वायवा दुपारी 2:30 वाजता डॉ.मनोजकुमार गायकवाड (शहादा) यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पार पडले. डॉ.प्रतिक पटेल(सुरत) हे बहिस्थ परीक्षक म्हणून उपस्थित होते.
या यशाबद्दल प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य तथा खानदेश शिक्षण मंडळाचे चिटणीस डॉ.अरुण बी जैन,खा.शि.मंडळाचे सह सचिव डॉ.धिरज वैष्णव,सेवानिवृत्त प्रा.डॉ.जयेश गुजराती,डॉ.विजय तुंटे,डॉ.हर्षवर्धन जाधव,डॉ.व्ही बी मांटे,डॉ.मिलिंद ठाकरे,डॉ.धनंजय चौधरी,डॉ.आर सी सरवदे,ग्रंथपाल दिपक पाटील,डॉ.रवी बाळसकर,प्रा.वैशाली राठोड,कुलसचिव राकेश निळे याचप्रमाणे रवी नगर येथील रहिवाशी उपप्राचार्य प्रा.पराग पाटील,डॉ.अमित पाटील,कपिल मनोरे यांची पत्नी पूजा मनोरे, त्यांच्या ताई सौ प्रिया तुषार रजाळे,डॉ.तुषार विश्वासराव रजाळे,त्यांची मुलगी गौरीशा मनोरे या सर्वांनी अभिनंदन केले आहे.
वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेतील विभाग प्रमुख डॉ.योगेश तोरवणे, डॉ.ज्ञानेश्वर मराठे,डॉ.किरण सूर्यवंशी,डॉ.किरण भागवत, डॉ.अनिल झळके, डॉ.बालाजी कांबळे, प्रा.चोरडिया तसेच कपिल मनोरे यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल ज्युनिअर कॉलेजचे प्रा.के.जी मोरे,प्रा.बिरारी यांनी देखील अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल संशोधक कपिल मनोरे यांचे सर्वत्र स्वागत व अभिनंदन होत आहे.