अमळनेर प्रतिनीधी येथील ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थ जवखेडे यांचेकडून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा – २ या उपक्रमात सलग दुसऱ्या वर्षी तालुकास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद जि प प्राथ शाळा जवखेडे यांचा अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.नानासो.श्री. प्रभाकर पाटील यांनी भुषविले. प्रथम इयत्ता ३ री च्या विद्यार्थीनीनी ईशस्तवन सादर केले. सर्व मान्यवरांनी प्रतिमा पूजन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री छगन पंढरीनाथ पाटील यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याबाबत सविस्तर माहिती दिली. इयत्ता ४ थी च्या विद्यार्थिनीनी संगीतमय स्वागत गीत सादर केले. मुख्याध्यापक श्री.छगन पंढरीनाथ पाटील,श्रीम. रत्नप्रभा बारीकराव साळुंखे मँडम,श्रीम.रेखा वकीलाल पाटील मँडम,सौ सुनिता रत्नाकर पाटील मँडम, श्रीम.अर्चना मनिलाल बागुल मँडम, श्री.मुकेश मुरलीधर पाटील सर, श्री.माधवराव साहेबराव ठाकरे सर या सर्वांचा यथोचित सत्कार सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत नव्याने रूजू झालेल्या श्रीम.अनिता ताराचंद बोरसे यांचे देखील स्वागत करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती शिक्षणतज्ञ मा.श्री.निंबा रूपचंद पाटील यांनी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांचा वैयक्तिक सत्कार केला. त्यानंतर गावातील सर्व आशा सेविका यांनी देखील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यांचा सत्कार केला. शिक्षण परिषदेचे सुत्रसंचलन व सर्व कार्यक्रम यातून विद्यार्थ्यांना मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून सहभागी विद्यार्थ्यांना पॅड व लेखन साहित्य वाटण्यात आले. निवृत्त मुख्याध्यापक निंबा पाटील यांनी शिक्षकांचे महत्व पटवून सांगितले.मा. जि.प. सदस्य श्री.संदिप पाटील यांनी आपल्या मनोगतात शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. कविता पाटील यांनी शाळेच्या कामकाजा विषयी कौतुक केले. सर्व उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत कडून पोहे व सोनपापडी चा नाश्ता देण्यात आला. सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन मा.प्रा.श्री.सुनिल पाटील सर यांनी केले.
याप्रसंगी श्री.जिजाबराव पाटील श्री.दिनकर पाटील, श्री.चुडामण पाटील, श्री.रविंद्र माळी,श्री.पुरुषोत्तम पाटील, श्री.नेताजी पाटील, श्री.प्रशांत पाटील, श्री.डाँ. प्रफुल्ल पाटील श्री.नितीन पाटील,श्री भाऊसाहेब पाटील, श्री.त्र्यंबक माळी, श्री.जिजाबराव भिल, ग्रामसेवक श्री.न्याहळदे आप्पा आशा सेविका सौ.उषाताई पाटील,सौ.मनिषाताई पाटील,सौ.शिलाताई भिल ग्रापंचायत कर्मचारी श्री.जगदिश पाटील, श्री.भूषण जैन,श्री किशोर बंजारा,श्री.भैय्यासाहेब पाटील श्री.सुकदेव पाटील श्री.सतिलाल भिल.उपस्थित होते.*