अमळनेर येथील प्रांतधिकारी महादेव खेडकर यांची धुळे येथे उप जिल्हाधिकारी (रोहयो) म्हणून प्रशासकीय बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी धुळे येथील उप जिल्हाधिकारी (रोहयो) श्री नितीन मुंडेवार यांची बदली करण्यात आली असून तात्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे.
अमळनेर येथील प्रातंधिकारी महादेव खेडकर हे उत्तम प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची ख्याती निर्माण झाली होती.त्यांच्या कार्यकाळात जातीच्या दाखल्यांचे प्रकरण तात्काळ मिळत असल्याने तत्पर अधिकारी म्हणून सर्व सामान्य नागरिक आदराने नाव घेत आहेत.झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अतिशय संयमाने उत्तमरीत्या कामगिरी पार पाडली.त्यांचा कार्यकाळ अमळनेरकरांच्या सदैव स्मरणात राहील.