अमळनेर प्रतिनीधी,येथील प्रताप हायस्कूल केंद्राची शासकीय रेखाकला परीक्षा म्हणजेच एलिमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षा सम्पन्न झाली. 25 ते 28 सप्टेंबर चाललेल्या या परीक्षेस तालुक्यातील 40 शाळांचे एलिमेंटरीचे 806 तर इंटरमिजीएटचे 800 विद्यार्थी सहभागी झाले होते.केंद्र संचालक म्हणून एस बी निकम होते.परीक्षा प्रमुख म्हणून सी.एस. कंखरे, समन्वयक म्हणून डी.एन.पालवे,योगेश जाधव,कुंदन पाटील यांनी काम पाहिले.याप्रसंगी कला शिक्षक विकास शेलकर यांची महात्मा फुले विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाली म्हणून सत्कार करण्यात आला.सचिन साळुंखे साने गुरुजी संचालकपदी,सी.एस. कंखरे खाशी पतपेढी चेअरमन, डी.एन.पालवे खाशी पतपेढी संचालकपदी निवड झाली म्हणून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कलाध्यापक संघाचे जिल्हा व विभागीय पदाधिकारी आरडी चौधरी, नितीन सोनवणे,लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर महाजन,सुनीता देसले, अशोक पाटील, दिलीप पाटील, भूषण सोनवणे, सूर्यकांत निकम, दिनेश सुर्यवंशी, वसंत पाटील, दिपक वाघ, मनोहर पाटील,भटू भदाणे, व्ही.डी.पाटील, योगेश चौधरी व तालुक्यातील सर्वच कला शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी रुंधाटी शाळेचे या वर्षी मयत कलाशिक्षक के.डी. पाटील व मुडी शाळेचे कलाशिक्षक हर्षल सोनवणे यांचे वडील डॉ.सतीश सोनवणे यांना उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली गेली.