अमळनेर येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाचे एनएसएस दत्तक गाव करणखेडा येथे दि. 19 /12/ 2024 रोजी सकाळी 11 वाजता मा. दादासो. शरद दिलीप बागुल ( शहीद सैनिक कुटुंब सदस्य) यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन झाले.
हिवाळी श्रम संस्कार शिबिर दैनंदिनी सकाळ सत्र जागर, प्रार्थना ध्यानधारणा योगासने चहापान व अल्पोहार श्रमदान स्वयं स्वच्छता, दुपार सत्र भोजन , गीतमंच ,व्याख्याने दोन तसेच संध्याकाळ सत्र चहापान, मैदानी खेळ व गटचर्चा, भोजन.रात्रीचे सत्र सामाजिक विचार मंथन व दैनंदिन लिखाण तसेच दत्तक गावातील समस्यांवर चर्चा, दीप मालवण इत्यादी.तसेच दररोज बौद्धिक प्रबोधन- आपत्ती व्यवस्थापन,मूल्य शिक्षण काळाची गरज, स्वच्छ भारत युवा संवाद, इंडियातून भारत निर्माण करणे, विकासातून युवकांचे योगदान,शाश्वत ग्रामविकास, जागो ग्राहक जागो,माझी वसुंधरा, मतदार जनजागृती, मानवी जीवनातील योगाचे महत्व, पाणी व्यवस्थापन, बालविवाह कायदा, बालविवाह थांबवण्यासाठी जनजागृती. यावरील विषयांवर मान्यवर
व्याख्यात्यांचे बौद्धिक प्रबोधन होणार आहे.
सदर राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचा समारोप दि. 25/ 12/ 2024 रोजी होणार आहे.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच ग्राम विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.आबासो. श्री. जयवंतराव मन्साराम पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मा. श्री आबासो. देविदास शामराव पाटील (उपाध्यक्ष ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड )तसेच मा. श्री. आबाजीसो. देविदास बारकू पाटील (सेक्रेटरी ग्रामविकास शिक्षण मंडळ) मा.श्री. भाऊसो युवराज काशिनाथ पाटील (संचालक )मा. आबासो. विश्वासराव विनायकराव पाटील (संचालक) मा. आण्णासो. लोटन शिवदास पाटील (संचालक )श्री.आबासो. चंद्रकांत रामराव शिसोदे (संचालक )श्री.दादासो. मनोज हिम्मतराव साळुंखे (संचालक ) श्री.भैय्यासो. दिनेश वासुदेव साळुंखे (संचालक )श्री.दादासो. महेंद्र सुरेश पाटील (उपसरपंच करणखेडा ग्रामपंचायत)मा. ताईसो. अलकाबाई गुलाबराव धनगर (सरपंच ग्रामपंचायत करणखेडा )मा.श्री.बापूसो. शांताराम शामराव पाटील (माजी जि. प.सदस्य) मा. श्री. दादासो.राकेश गुरव (अध्यक्ष विकास मंच मारवड ) मा.श्री.नानासो. ताराचंद सिताराम सूर्यवंशी (सामाजिक कार्यकर्ते) मा.श्री. आबासो. हरिभाऊ नथू मारवडकर (चेअरमन सार्वजनिक वाचनालय मारवड)मा.श्री. नरेंद्र शांताराम पाटील (सदस्य महाविद्यालय विकास समिती) मा. ताईसो. कविताबाई महेंद्र पाटील (माजी सरपंच करणखेडा) मा. ताईसो. कविताबाई भानुदास धनगर (माजी सदस्य ग्रामपंचायत करणखेडा ) उपस्थित होते. तसेच विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालय करणखेडा येथील मुख्याध्यापक शिक्षक वृंद उपस्थित होते.तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य,प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.