पत्रकारांसाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापनेसाठी महाराष्ट्र सरकारच्या निर्णया बद्दल: मा.देवेंद्र फडणवीस यांचा डॉ. विश्वासराव आरोटे ह्यांच्या कडून सत्कार! पत्रकार हितासाठी स्वतंत्र महामंडळ: फडणवीस यांचा सत्कार सोहळा!

पत्रकार संघाच्या मागण्यांना यश: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघा तर्फे फडणवीस यांचा सत्कार!

मुंबई:प्रतिनिधी:महाराष्ट्र सरकारने पत्रकारांसाठी व स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करण्याचा ऐतिहासिक क्रांतिकारक निर्णय घेतल्या बद्दल महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

हा सत्कार राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी फडणवीस यांना साईबाबांची मूर्ती, खारीक-खोबऱ्याचा हार, डायरी, घड्याळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

सत्कार समारंभात पत्रकार संघाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे किरण जोशी.सोशल मिडिया प्रमुख सिध्दार्थ भोकरे रायगड जिल्हा अध्यक्ष राकेश खराडे.सिंधुदुरग जिल्हा अध्यक्ष प्रसन्न गोंदवले.नगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे पाटील, अकोले तालुका कार्याध्यक्ष हरिभाऊ फापाळे, मंत्रालयीन प्रतिनिधी विष्णु बुरे तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने पत्रकारांच्या विविध समस्या आणि मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर दिक्षा भुमी ते मुंबई मंत्रालय अशी संवाद यात्रा संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. या यात्रेदरम्यान संघाने पत्रकारांसाठी एकूण २४ मागण्या मांडल्या होत्या.

महायुती सरकारच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांसाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापनेची मागणी मान्य करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. अखेर, सरकारने ही मागणी मान्य करत पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे पत्रकारांच्या समस्या सुटण्याची वाट मोकळी झाली आहे.

स्वतंत्र महामंडळाच्या स्थापनेमुळे पत्रकारांना आर्थिक सुरक्षा, विमा संरक्षण, तसेच विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळेल. विशेषत: ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासोबतच, महामंडळाच्या माध्यमातून पत्रकारांना विविध सुविधा आणि सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना झाल्यामुळे त्यांना काही महत्त्वाच्या सुविधा मिळू लागल्या आहेत. मात्र, अजूनही पत्रकार संघाच्या २२ मागण्या प्रलंबित आहेत. यामध्ये पत्रकारांसाठी स्थिर वेतन योजना, निवृत्तीवेतन, आरोग्य विमा, अपघात विमा, विशेष गृहनिर्माण योजना, तसेच पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी शिष्यवृत्ती योजना यांचा समावेश आहे.

पत्रकार संघाने उर्वरित मागण्या तातडीने पूर्ण करण्याची विनंती सरकारकडे केली आहे. यामध्ये सर्व पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याचा आग्रह धरण्यात आला आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकार संवाद यात्रेचे एक विशेष पुस्तिका देवेंद्र फडणवीस यांना प्रदान करण्यात आली. यानंतर उपस्थितांनी महामंडळाच्या माध्यमातून पत्रकारांच्या हितासाठी प्रभावी निर्णय घेतले जातील, असा विश्वास व्यक्त केला.

या ऐतिहासिक निर्णयामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात एक नवे पर्व सुरू होणार असून, पत्रकारांचे हक्क आणि सुरक्षा सुनिश्चित होण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडले आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांनी या निर्णयाचे स्वागत करत फडणवीस आणि त्यांच्या टीमचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!