अमळनेर प्रतिनीधी ,शिवचरण फाउंडेशनच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा यावर्षीचा पत्रकारिता पुरस्कार शिक्षक ,कवी तथा ‘लेखन मंच’ चे कार्यकारी संपादक अजय भामरे यांना भारतातील पहिली महिला सर्पमित्र तथा (राष्ट्रपती पुरस्कार नारीशक्ती सन्मान, भारत सरकार) मा. वनिताताई बोराडे यांच्या हस्ते दि.२९ सप्टेंबर२०२४ रोजी मुक्ताईनगर येथे प्रदान करण्यात आला.
या समारंभाला मा सौ.रोहिणीताई खडसे ( चेअरमन मुक्ताईनगर तालुका एज्यु. सोसा.मुक्ताईनगर) यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रा.डॉ सुभाष बागल (फाऊंडेशन राज्य सचिव ,छ.सं नगर) शिवचरण फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ शिवचरण उज्जैनकर,तुळसशीराम बोबडे (राज्य सल्लागार )यासह आदी मान्यवर उपस्थित होते.शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.