अमळनेर प्रतिनिधी, येथील कु. साक्षी सुनिल आगोणे हीने मेहनत करून मेडिकल प्रवेश परीक्षेत चांगले गुण प्राप्त केल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळाला प्रवेश.
अमळनेर मारवड पोलिस ठाण्यात पोलिस हेडकॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले सुनील अगोने यांची कन्या कुमारी साक्षी हीने अथक परिश्रम घेऊन NEET परीक्षेत चांगले गुण प्राप्त करून आपल्या आई वडिलांचे स्वप्नपूर्ती केली.
वडील पोलिस खात्यात असल्याने कमी खर्चात कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वडिलांची होत असलेली दमछाक याची तिला जाणीव होती.चांगले शिक्षण घेऊन उच्च शिक्षित अधिकारी व्हावे ,ही तिची दाट इच्छा होती.तिने मनाशी खून गाठ बांधली व पालकांच्या स्वप्नपूर्ती साठी अभ्यासात मग्न झाली.तिने इयत्ता 12 वीला मारवड येथील कै. भालेराव रामभाऊ पाटील सायन्स ज्युनियर कॉलेज मारवड येथे शिक्षण घेतले.तिला इयत्ता 12 वित 81.67% गुण मिळाले.तिचे लहान पणापासून चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नाशिक येथे NEET परीक्षेची पूर्व तयारी करीता क्लास लावलेले.जिद्दीच्या जोरावर तिने चालु वर्षी दिलेल्या NEET परीक्षेत 720 पैकी 625 मार्क्स मिळवून उत्तीर्ण झाली आणी आता तिची मुबंई मधील G.S.M.C. (K.E.M.) या Government Medical Collage येथे MBBS ला नंबर लागला आहे. तिच्या मेहनतीला फळ मिळाले आहे.परिसरातून तिच्या सह कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
करडी नजर न्युज चे मुख्यसंपादक प्रा डॉ विजय गाढे यांनी तिचे मनस्वी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.