ठाणे प्रतिनिधी, येथील श्री.विजय सुमन् बन्सीलाल अह्विरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक ,विशेष शाखा, ठाणे शहर यांनी (एम.पी. ए.)नाशिक येथे (टि.ओ.टि. ) इलेक्शन माडयुल ट्रेनिंग यशस्ववी रित्या पुर्ण करुन आल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तालयातील ९१ टक्के पोलीस अधिकारी आणि ९०.२० टक्के पोलीस अंमलदार यांना लोकसभा २०२४ सार्वत्रिक निवडणुकीसाठी उपयुक्त आदर्श निवडणुक आचारसंहिता, निवडणुक व व्यवस्थापन बंदोबस्त आदेश परिपत्रके याबाबत स्वतः पुढाकार घेवुन सर्वाना उत्तमरित्या प्रशिक्षण दिले. त्यामुळे ठाणे आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यास मदत झाली. या उल्लेखनीय कामगिरीबाबत त्यांना ठाणे शहर पोलिस आयुक्त श्री आशुतोष ठोंबरे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.या प्रसंगी जॉइंट पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, एडिशनल पोलिस आयुक्त श्री उगले,एडिशनल पोलिस आयुक्त जाधव यांच्या सह अनेक अधिकारी सह कर्मचारी उपस्थित होते.
पोलिस आयुक्त श्री ठोंबरे यांनी श्री विजय अहिरे यांना शुभेच्छा देत आपण भविष्यात देखील अशाप्रकारे उत्कृष्ट कार्य कराल,असा दृढ़विश्वास व्यक्त केला.
सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय सुमन् बन्सीलाल अह्विरे हे कॉलेज जीवनात ही उत्तम कामगिरी करीत असत.पोलिस दलाचे त्यांना कॉलेज जीवनातच ओढ होती.त्यांनी त्या करीता NCC मध्ये प्रवेश घेतला होता.सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री विजय अहिरे होय.त्यांना गाण्याचा छंद असल्याने पोलिस वर्दीतील उत्तम गायक म्हणून ही त्यांची ख्याती आहे .
श्री विजय अहिरे यांचे अभिनंदन त्यांचे मित्र करडी नजर न्युज चे मुख्य संपादक प्रा डॉ विजय तुळसाबाई शालिग्राम गाढे,पोलिस निरीक्षक मारुती जाधव,उद्योजक अनिल शिंदे, हेड कॉन्स्टेबल शशी पाटील, प्रशांत कांबळे,प्राचार्य विजय परब, आर्दश शिक्षक पंकज चौधरी, प्रकाश बाविस्कर, दिलीप खडतारे,संतोष खोत, मुंबई विद्यापीठातील भूषण प्रधान,गृह उद्योजिका वैशाली अगीवले,सौ अनुपमा हेडगिर,हेड कॉन्स्टेबल उज्वला मर्चंड उर्फ यादव,मलेरिया अधिकारी मिलिंद पट्टेबहादुर,उल्हासनगर कोर्ट बार कौन्सिल अध्यक्ष संजय सोनवणे, ऍड रविकांत अहिरे,संदीप सोनवणे,किरण तांजनपुरे आदी मित्रांनी ही त्यांचे मनापासून अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.