अमळनेर प्रतिनिधी येथील रामेश्वर गावाचा तरुण सैन्य भरती झाल्याने शिवराना ग्रुप तर्फे करण्यात आले अभिनंदन.
रामेश्वर खु.गावातील गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या होतकरू शेय्यर भास्कर पाटील याने सैन्यात भरती होण्याचे मनाशी खूणगाठ बांधली व सतत चार वर्ष मेहनत घेतली.कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असल्याने घरातील एकुलता एक मुलगा असल्याचे भान ठेवून त्याने सैन्य भरती चे स्वप्न उराशी बाळगून तयारी केली व अखेर संभाजी नगर येथे झालेल्या सैन्य भरतीच्या शारीरिक व लेखी तोंडी परीक्षेत यश संपादन केले.ही गोष्ट शेय्यर च्या मोल मजुरी करणाऱ्या वडिलांना कळताच त्यांच्या डोळ्यात आनंद आश्रु आले असल्याचे त्याने सांगितले.कारण घर परिवारातील तो एकटाच मुलगा व त्याला दोन बहिणी आहेत.तो सध्या अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात एफ.वाय.बी एस्सी वर्गात शिकत आहे.
शिवराणा ग्रुप ने केला सन्मान..
शेय्यर पाटील हा सैन्य भरती साठी प्रयत्नशिल असल्याचे सर्व गावाला माहीत होत.त्याचे स्वप्न पूर्ण होऊन गावाचे नाव उंचावले म्हणून शिवराना ग्रुप चे महेंद्र राजपूत व योगेश राजपूत यांनी आपल्या कार्यकर्त्या समवेत त्याच्या घरी जाऊन शाल श्रीफळ व पांडुरंगाची मूर्ती देऊन सन्मान केला.