अमळनेर प्रतिनिधी,आपल्या अमळनेर तालुक्याला शूरवीरांचां इतिहास लाभलेला आहे. त्यातच आपल्या अमळनेरातील युवकांनी विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे.
सविस्तर वृत्त असे की, सन २०१२ ते २०१८ असे एकूण चार वर्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सुरक्षा रक्षक अर्थात SPG कमांडो म्हणून सेवा दिलेले अमळनेरचे सुपुत्र अरविंद बैसाणे यांना CISF विभागामार्फत कर्तव्य सेवानिष्ठ व उत्कृष्ट कामगिरीबद्दल संरक्षण विभागामार्फत हेड कॉन्स्टेबल पदी पदोन्नती करण्यात आली आहे.सध्या ते नागपूर येथे कार्यरत आहे.
त्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे खानदेश विभागीय उपाध्यक्ष मा.प्रा डॉ विजय गाढे,पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष समाधान मैराळे व तालुका कार्यकारिणीने अभिनंदन केले आहे.तसेच संपूर्ण अंमळनेरकर त्यांच्या वर कौतुकाच्या वर्षाव करत आहे.कमांडो अरविंद बैसाणे हे पत्रकार प्रवीण बैसाणें यांचे लहान बंधू आहेत तर ते अमळनेर मधील धनदाई माता एज्युकेशन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.