अमळनेरचां आमदार सहाच महिन्यात अप्रिय का झाला ? अमळनेरकरानी विचार करावा…बाळासाहेब थोरात 

 

अमळनेर येथील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस चे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची प्रचार सभा काल अमळनेर मधील मराठा मंगल कार्यालय मध्ये पार पडली.

या सभेला संबोधन करतांना बाळासाहेब थोरात यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,महायुतीचे भ्रष्ट सरकार घालवायचे असल्यास एकजुटीने काम करावे,अमळनेर मधील आघाडीची एकजूट ही राज्यासाठी आदर्श ठरणार आहे.यामुळे आघाडीचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांचा विजय नक्की होणार ,यात तिळमात्र शंका नाही मात्र कार्यकर्त्यांनी गाफील राहून चालणार नाही.आपले उमेदवार हे स्पष्ट वक्ते आहेत .त्यांच्या पोटात जे आहे तेच त्यांच्या ओठात येते,हे चांगल्या माणसाचे लक्षण आहे.डॉ अनिल शिंदे यांनी कोरोणाच्या काळात लोकांचे जीव वाचवून भरीव कामगिरी केली आहे.तुमचा स्थानिक आमदाराने शरद पवार साहेबांच्या सोबत गद्दारी केल्याने सहा महिन्यातच अप्रिय झाला. अमळनेरकरानी अश्या गद्दार बाबत विचार करावा,अमळनेर करना स्वच्छ प्रतिमा असलेला योग्य उमेदवार मिळाला आहे त्यामुळे बनवाबनवी व भ्रष्टाचार चा मार्ग अवलंबलाकरणाऱ्या सरकार मधील उमेदवारांचा बंदोबस्त येणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदार नक्की करतील.आपल्याला शरद पवारांच्या संकल्पनेतील वैभव संपन्न असलेला महाराष्ट्र बनवायचे आहे.यामुळे अमळनेरकरानी डॉ अनिल शिंदे यांना भरघोस मतांनी विजयी करावे.या प्रसंगी अमळनेर च्या समस्त मराठा समाज तर्फे बाळासाहेब थोरात यांना समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 

सदर सभेत आघाडीचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांनी आवाहन केले की मतदारांनी अस्मिता जागृत ठेवावी,मी व्यवसायाने डॉक्टर असल्याने जो आजार आहे तोच सांगतो त्याच प्रमाणे चाटमाऱ्या आमदारची सर्जरी करणार असल्याने त्यामुळे तो पुढे थापा मारणार नाही.शेतकऱ्यांना चाट मारणाऱ्या बद्दल संताप अनावर होतांना दिसत आहे.लोकांना प्रामाणिक व त्यांच्या वेदना समजून घेणारा व्यक्ती हवा असल्याने आपला विजय नक्की आहे.कार्यकर्त्यांनी एकनिष्टपने कामाला लागणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

 

शिवसेना ज्येष्ठ नेत्या एड ललिता पाटील यांनी सांगितले की,आघाडीतील वरिष्ठांनी अमळनेर मधील आघाडीतील व्यक्तींवर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद करते,लाडकी बहिण अगोदर लाडक्या नव्हत्या का ? निवडणुकीच्या तोंडावर च लाडक्या कश्या झाल्या,स्थानिक आमदार हे भूमिपुत्र नसून बॅनर पुत्र आहे.अमळनेर म्हणजे त्यांच्या बापाची जाहिगीरदारी आहे का ? राज्यात विद्यार्थी व शेतकरी यांच्या आत्महत्या सर्वाधिक आहे,स्थानिक आघाडीतील नेत्यांनी एकमेकांना कमी समजू नका,नत भ्रष्टतां करू नका, असे आवाहन त्यांनी केले.

 

काँग्रेसच्या प्रतिभा शिंदे यांनी सांगितले की,पाच वर्षांत टक्केवारी मिळवणारे गद्दरला याभुमितच गाडा,सर्व पदे व सन्मान आमदाराच्या घरात,शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणनाऱ्या धडा शिकवा,विमा मिळावा म्हणून लढणारे वेगळे आणि श्रेय मात्र आमदार घेतो,महाराष्ट्र धर्म नासवणाऱ्याना घरी पाठवा,हमीभाव नदेणाऱ्यांचा शेतकर्यांनी बदला घेण्यासाठी तयार रहा,असे आवाहन केले.

 

याप्रसंगी सूत्र संचालन संदीप घोरपडे व मनोज पाटील यांनी केले.मंचावर उपस्थित इच्छुक उमेदवार यांनी सन्मान पूर्वक माघार घेतली म्हणून बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी आघाडीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!