अमळनेर येथील तालुक्यातील शेतकऱ्यांचे पीकविमा असो की कोणतेही अनुदान शेतकऱ्यांसाठी असलेल्या आंदोलनात डॉ. अनिल शिंदे हेच सोबत असतात, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी डॉ. शिंदे यांनाच या बहुमताने विजयी करण्याचे आवाहन बाजार समिती संचालक व किसान काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. सुभाष जिभाऊ यांनी तालुक्यातील जनतेला केले आहे.
गेल्या दहा वर्षात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नावर लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला नाही. अनेकदा लोकप्रतिनिधींच्या व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा परत गेला आहे. अनेक वर्षापासून तालुक्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटांशी सामना करत करत हतबल झाला आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांकडे सर्रास दुर्लक्ष केले आहे. तालुक्यातील ३२ गावांच्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदानाबाबत लोकप्रतिनिधींच्या निरुत्साही भूमिकेमुळे ३ वर्ष लेट पैसे भेटले. तेही किसान काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले, त्यानंतर हे अनुदान जमा झाले. मागील काही वर्षात शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अनेकदा किसान काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन करत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात आला. त्यावेळी प्रत्येक आंदोलनात डॉ. अनिल शिंदे हे नेहमी खांद्याला खांदा लाऊन सक्रिय सहभाग घेत होते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी लढणारे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांना निवडून द्यावे असे आवाहन प्रा. सुभाष जिभाऊ यांनी शेतकरीवर्ग व जनतेला केले आहे.