अमळनेर प्रतिनिधी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांचा प्रचार अमळनेर तालुक्यात जोरात सुरू असून त्यांना स्थानिक जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अमळनेर तालुक्यातील विकासाबद्दल बोलायचे झाल्यास, कागदावरचे आकडेवारी आणि प्रत्यक्ष स्थिती यात एक मोठा विरोधाभास आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथे विकास झाला का? हा एक प्रश्न आहे. कमिशन आणि टक्केवारीच्या राजकारणामुळे अमळनेरचे विकास थांबल्याचे चित्र दिसते. असे अनंत निकम यांनी सांगितले.
महत्वाचा मुद्दा म्हणजे, नर्मदा फाउंडेशनमधील डॉ. अनिल शिंदे यांच्या कार्यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांनी अनेकांना आरोग्य सेवेत मदत केली आहे. यामुळे स्थानिक जनतेत त्यांच्या कार्याची कदर केली जाते.
डॉ. शिंदे काँग्रेस पक्षाचे एक अनुभवी पदाधिकारी असून, त्यांनी अनेक सामाजिक आणि राजकीय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. यामुळे त्यावर कोणत्याही प्रकारचा आरोप न लागल्याने त्यांच्या उमेदवारीला अधिक बळ मिळत आहे.
*अमळनेरच्या समस्यांची जाणीव*
अमळनेर तालुक्यात अनेक गंभीर समस्या आहेत. रोजगाराची कमी, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नसणे, जसे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली, हे गंभीर मुद्दे आहेत. सुशिक्षित बेरोजगारांना योग्य काम मिळत नाही आणि अनेक कंपन्या अमळनेरमध्ये अद्याप स्थापन झालेल्या नाहीत.
हे लक्षात घेता, अमळनेरचा वास्तविक विकास साधायचा असेल तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही. डॉ. अनिल शिंदे यांनी जातीपातीच्या राजकारण कधी केले नाही .अमळनेर तालुका त्यांच्या पाठीशी त्यांची मतदारसंख्या भक्कमपणे उभी राहील, अशी आशा अनंत निकम यांनी व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांचा प्रचार अमळनेर तालुक्यातील रहिवाश्यांना विकासाची आशा देतो. त्यांच्या कार्यकौशल्यामुळे तालुक्यातील वैद्यकीय आणि सामाजिक समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अमळनेरचा खरा विकास साधणे शक्य आहे. स्थानिक जनतेने त्यांना पूर्ण समर्थन देऊन या ऐतिहासिक संधीचा लाभ घेतला पाहिजे. महाविकास आघाडीच्या यशाने अमळनेरचे भविष्य उज्ज्वल होईल, असा विश्वास निकम यांनी व्यक्त केला आहे..
महाविकास आघाडीचे उच्च शिक्षित डॉ अनिल शिंदे यांच्या पाठीशी जनतेने का उभे राहू नये? असा प्रश्न अनंत निकम यांनी व्यक्त केला आहे.
माय बाप जनतेला मी एव्हडेच सांगू इच्छितो जेंव्हा आपण आजारी पडतो तेंव्हा आपण जातीच्या डॉक्टर कडे जातो का? त्या वेळेस आपल्या डोळ्यसमोर चांगला डॉक्टर कोण? असे चित्र समोर येते मग येन निवडणुकीत आपण जात बघून मतदान का करतात? चांगला, सदचरित्र, प्रामाणिक, जिद्दी ई असे चांगले गुण ज्याच्यात आहे त्याला मतदान करा.
आज अंमळनेर मतदार संघातील शेतकऱ्यांची हालत बकाल झाली,पिकले आहे पण योग्य दरात विकले जात नाही. अगोदरच दुष्काळ, गारपीट, अवकाळी अश्या विविध अस्मानी सुलतानींनी त्याच्यावर घावा घातला. त्यात तालुक्याचा मंत्री असून त्यांनी शेतकऱ्यांना भरीव निधी आणू शकले नाही हे दुर्दैव, विशेष पाडळसरे धरणावर मोठ मोठाली भाषणे देऊन देऊन धरणाची उंची शाब्दिक वाढवली पण अस्तित्वात काही उंची वाढली नाही सादरण 2019 पासूनच्या जलसाठ्यात 2थेंब देखील वाढूऊ शकले नाहीत. सत्तेत नसताना गळ्यात कापसाची माळ, कांद्याची माळ, कापसाची टोपी घालून कापसाला, कांद्याला योग्य भाव दया अश्या घोषणा देणारे मंत्री आज सत्तेत असून केंद्रसरकारने 28 लाख टन कापूसाच्या गाठी आणि तूर आईनं दिवाळीत परदेशातून आयात केले आणि जो शेतकऱ्यांना रु 10,000/- प्रति क्विंटल भाव मिळणार होता तो शेतकऱ्यांनच्या तोंडचा घास पळावला गेला तरी मंत्री यावर मूग गिळून गप्प मग कसले हे भूमीपुत्र हे तर नकली आणि स्वार्थी भूमिपुत्र म्हणावे. रस्त्याचा विकास तर असा झालाय कि जणू रस्ते हे फक्त 6 महिण्यान साठीच बनवले होते का? असे चित्र सर्वधुर दिसत आहे. फक्त नावाला विकासासाठी इतके कोटी आणले तितके कोटी आणले हवेत बोंबा मारतात पण भुतलावर विकासाची सत्यता विदारक आहे हे जनता पहात आहे. तालुक्यात जितके लोक करोना काळात मृत्यू मुखी पडले नाहीत त्यापेक्षा जास्तच माणसं योग्य इलाज न झाल्याने सर्प दंशात दगावलेत ही बाब लाजिरवाणी वाटत नाही का त्यांना?सर्वसामान्य जनतेच्या पचणी यांचा विकास पडत नसल्याने यांची हकालपट्टी जनता सव्हीधानिक मार्गाने मतदान करून करतील आणि डॉ. अनिल शिंदे यांच्या सारख्या उच्च शिक्षित, सदचरित्र, प्रामाणिक विकासाचे धोरण असणारा चांगला उमेदवार पंजा या चिन्हावर मतदान करून निवडून आणतील व मा. शरदचंद्र पवार यांनी जो शब्द दिलाय “पुढील निवडणुकीत अनिल पाटील निवडून येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ ” हे खरे ठरवतील.