अमळनेर येथील विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांचा शहरी भागात प्रचार दौरा सुरू असून त्यांना प्रचारा दरम्यान भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
आज अमळनेर शहरातील फरशी रोड, जिंनगर गल्ली, अंदरपुरा, सराफ बाजार, मराठे गल्ली, आडवा सराफ बाजार, देशमुख वाडा, पान खिडकी, या ठीकाणी प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. ठिक-ठिकाणी माता भगिनींनी ओवाळून आशीर्वाद देत मोठा जनसमुदायाने शिरीष चौधरी यांच्या प्रचारात सहभागी होऊन प्रतिसाद दिला. यावेळी सर्वात महत्त्वाच्या विषय ठरला तो शिरीष चौधरी यांच्या प्रचारादरम्यान शहरातील महिला भगिनींनी स्वयंस्फुर्तीने शिरीष चौधरी यांचे स्वागत केले. यावेळी शहरातील तरुण वर्ग, वृद्ध, माता-भगिनी परिसरातील नागरिक यांचा मोठा सहभागी होता. सर्वांच्या चेहऱ्यावर एकच आनंद होता कीं शिरीष दादा चौधरी हे कुठल्याही परिस्थितीमध्ये अमळनेर विधानसभा मतदारसंघातील आमदार झाले पाहिजे असे नागरिकांच्या मनात असून त्यांनी शिरीष दादा यांच्या विजयाच्या घोषणा ही दिल्या.
मागील पाच वर्षात सामान्य जनतेला करावा लागतोय मनस्ताप
मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या रोषाला कंटाळून जनता शिरीष चौधरी यांना पुन्हा निवडून देण्याची शास्वती दाखवत आहे. माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासाची नांदी २०१४ ते २०१९ मध्ये झालेला विकास हाच खरा शास्वत विकास होता, असे जनता बोलू लागली आहे.