अमळनेर दिनांक ११ रोजी पारोळा येथे महाविकास आघाडीच्या सतीश पाटील व डॉ. अनिल शिंदे या दोन उमेदवारांच्या प्रचारार्थ खा. शरदचंद्र पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी अमळनेर मतदारसंघातून डॉ. अनिल शिंदे यांना विजयी करण्याचे आवाहन जनतेला केले.
या सभेस दोन्ही तालुक्यातून शेतकरी, युवक व महिलावर्गाचा मोठा प्रतिसाद लाभला. त्यावेळी शरद पवार म्हणाले की, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा. महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होत असून शेतमालाला भाव मिळत नाही, तरूणांना नोकऱ्या नाहीत, महिलांवर अत्याचार केला जातो. बिकट अवस्था आपल्या महाराष्ट्राची झालेली आहे.
त्यानंतर खा. पवार म्हणाले की, जवळचा मतदारसंघात डॉ अनिल शिंदे चांगले नेतृत्व आज उच्चशिक्षित आहेत, हा अतिशय साधा भोळा माणूस असून अमळनेकरांनी मोठ्या मतांनी डॉ.अनिल शिंदे यांना विजयी करा, अशी भावनिक साद घातली. यावेळी डॉ शिंदे यांनी शरदचंद्र पवार यांच्या पाया पडतांना भावनिक होत डॉ शिंदे यांना अश्रू अनावर झाले होते.