अमळनेर दिनांक 20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी अमळनेर नगर परिषदेतर्फे सर्व सफाई कामगार, कार्यालयीन अधिकारी व सर्व कर्मचारी वृंद तसेच शहरातील सर्व शाळांचे विद्यार्थी व शहरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत मतदारांना मतदानास प्रोत्साहित करण्यासाठी मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली.
सदर मतदार जनजागृती रॅलीस मोठा प्रतिसाद मिळाला. रॅलीचे नियोजन अमळनेर पालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले होते.नगरपरिषद ते तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली. या मतदान जन जागृती रॅलीत ज्यांनी खऱ्या अर्थाने मतदानाचा हक्क मिळवून दिला त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी संविधान पुस्तकास हार टाकून मतदान निर्भयपणे व मोठ्या संख्येने करण्याचे आवाहन केले.सदरच्या रॅलीमध्ये मतदारांना मतदान करणे कामी अतिशय चांगल्या घोषणा देण्यात आल्या.
या मतदार जनजागृती रॅलीत अमळनेर शहरातील इंग्लिश मीडियम सीबीएससी पॅटर्न चे विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे पथनाट्य सादर करून उपस्थित सर्व प्रेक्षकांची व नागरिकांची मने जिंकली. रॅलीच्या समारोप राष्ट्रगीताने झाला. रॅलीमध्ये उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण,बांधकाम अभियंते सुनील पाटील,डीगंबर वाघ, विवेकानंद इंटरनॅशनल स्कुल चे मुख्याध्यापक विनोद अमृतकर,श्री पाटील, फायर अधिकारी श्री.गोसावी ,आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, किरण कंडारे,स्कुल बोर्डाचे अधिक्षक सुनील पाटील, सोमचंद संदानशिव, आरोग्य विभागाचे सर्व मुकादम तसेच अग्निशमन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.