अमळनेर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉ अनिल शिंदे हे जळगांव जिल्हयात सर्वात जास्त मतांनी विजयी होतील येणाऱ्या २३ तारखेला हे भविष्यवाणी निश्चितच खरी ठरेल असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अजहर अली सैय्यद यांनी केले.
अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ अनिल शिंदे हे आरोग्य क्षेत्रातील जादूगर सुप्रसिद्ध डॉ म्हणून संपूर्ण खान्देशात परिचित आहे डॉ अनिल शिंदे हे जिल्ह्यात सर्वात जास्त मतांनी विजयी होतील हे शब्द ऐकून सर्वजण आश्चर्य व्यक्त करतील परंतु हे गणित शंभर टक्के खरेच ठरणार आहेत तसेच राज्यात महाविकास आघाडीची ही सरकार येणार आहे हे काळे दगडा वरची रेषा आहे डॉ अनिल शिंदे यांनी मतदार संघात प्रचारात आघाडी घेतली आहे महाविकास आघाडीचे सर्व जेष्ठ व युवा नेते कार्यकर्ते एकत्र जोमाने कामाला लागले आहेत येणाऱ्या काहीच दिवसात महाविकास आघाडीचे उच्चस्तरीय नेत्यांची सभा होणार आहे डॉ अनिल शिंदे हे निश्चितच जास्तीत जास्त मतांनी विजयी होतील