अमळनेर येथील श्री भद्रा प्रतीक उद्योग समूहाचे संस्थापक ,अर्बन बँकेतील संचालक तथा आदर्श साळी परिवारातील श्री. आबासाहेब दीपक छबुलाल साळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रताप साळी माजी नगरसेवक यांचे सुपुत्र युवा उद्योजक अक्षय उर्फ मॉन्टी प्रताप साळी याने काकांच्या वाढदिवसाला अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात गरजू रुग्णांना फळ फळावर व बिस्किटे वाटप करून वाढदिवस साजरा केला.सोबत श्री भद्रा प्रतीक मित्र मंडळाचे सदस्य योगेश भाऊ,एस टी महामंडळाचे नाना पाटील,जमील भाई मुजावर व इतर यांच्या सहवाटप करण्यात आले.काका पुतण्यांचे अतूट नात्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.