जळगांव प्रतिनिधी, येथील सूरजराजे नारखेडे मित्रपरिवार तर्फे. जनाई फाउंडेशन आयोजित आणि अँटीकरप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने नारी शक्ती महिला नियोजन समिती व शिवशक्ती क्रीडा मित्र मंडळ व एकच राजा ग्रुप मित्र परिवार किंग्स ग्रुप ऑफ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने शरद पौर्णिमेच्या दिवशी समाजामध्ये विविध क्षेत्रात नारीशक्ती ज्या ज्या ठिकाणी काम करते त्या त्या ठिकाणच्या डॉक्टर असेल वकील असेल किंवा सामाजिक सेवा किंवा योगा सारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या असेल, अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करत असताना त्यांच्या बद्दल समाजाने सन्मान म्हणून गौरव उद्गार काढावा म्हणून मंगलदायित्व स्वीकारून जनाई फाउंडेशनने त्यांचा सन्मान म्हणून 31महिलांचा “नारीशक्ती खानदेशची रणरागिणी पुरस्कार 2024” जाहीर करण्यात आला .त्यात जळगाव येथील उच्च शिक्षित योगा शिक्षिका वैशाली दामोदरे यांना योगाच्या माध्यमातून महिलांच्या गर्भावर चांगले संस्कार करीत असल्याने सदरचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी जळगाव शहराच्या महापौर जयश्रीताई महाजन समवेत डॉक्टर निलेश जी चांडक , कृष्णाजी खडके, मनीषा जी खडके या सह अनेक क्षेत्रातील मोठे मोठे मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पुरस्कारार्थी महिलांनी त्यांच्या सन्मानार्थ भाऊक आणि अश्रूवाहक झाल्या त्यांचा सन्मान पाहून ते स्वतः भारावून गेल्या होत्या.त्यांनी आयोजकांचे मनापासून आभार मानले.