पाचोरा येथील 1997 यावर्षी दहावीला शिकत असलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी एकत्रित येऊन महिला वरील अत्याचार निषेधार्थ प्रांताधिकारीनां दिले निवेदन*

पाचोरा प्रतिनिधी,पाचोरा शहर व परिसरातील १९९७ साली इयत्ता १० वी च्या सर्व वर्गमित्रांनी दोस्त माझे मस्त या ग्रूपच्या माध्यमातून एकत्र येऊन सध्या समाजाला भेडसावणारी समस्या म्हणजे अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी तसेच समाज प्रबोधन करणेकामी संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही देण्यात आली.

त्यावेळी ग्रुपच्या वतीने माननीय प्रांताधिकारी भूषण अहिरे यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी महिला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील काही दिवसात महाराष्ट्रातील विविध ठिकाणी अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याच्या बऱ्याच घटना घडल्याचे प्रसारमाध्यमातून समोर आलेले आहे.

समाजात अशा प्रकारच्या घटनाचा लहान मुलांच्या बालमनावर दीर्घकालीन परिणाम होतो घटनांचा बालकांच्या पूर्ण आयुष्यावर पगडा राहतो अशा घटनांमुळे मुलं हे डिप्रेशन सारख्या मानसिक आजाराने ग्रस्त होतात व त्यांच्या पूर्ण आयुष्याचे नुकसान होते. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी आपल्याकडे विविध कायदे अस्तित्वात आहेत पण त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत त्यामुळेच तर गुन्हेगार अशा प्रकारचे गुन्हे करायला धजावत आहेत. आम्ही आपणास विनंती करतो की आपण सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून सदर प्रकरणांमध्ये लक्ष घालून या आरोपींवर कठोर कारवाई होईल व भविष्यात अशा प्रकारचे गुन्हयांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी यासाठी सर्व शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था मिळुन समन्वय समिती गठित करून त्यात शाळा व पालक यांचा समन्वय साधून काहीतरी चांगला मार्ग निघेल त्यामुळे भावी पिढीला आपण अशा प्रकारच्या गुन्हयांपासून वाचवू शकतो. आम्ही आपल्या या कामांमध्ये आम्हाला जे शक्य आहे त्या पद्धतीने मदत करण्यासाठी सदैव उपलब्ध आहोत आणि आपण शासनाच्या माध्यमातून आमच्या पाल्यांचं आयुष्य कसं सुरक्षित राहील यासाठी नक्कीच प्रयत्न कराल याबद्दल आशावादी आहोत आम्ही इथे विशेष नमूद करू इच्छितो की शाळांमध्ये वि‌द्याथ्यांना या संदर्भात प्रबोधन होण्यासाठी काही पावलं उचलली जात आहेत त्यांचे आम्ही स्वागत देखील करतो पण पालकसभेमध्ये अशा प्रकरणांवर चर्चा होऊन काहीतरी चांगला मार्ग निघावा त्यासाठी इंग्लिश माध्यमासोबत मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या सभा होऊन त्याचा आढावा आपण घ्यावा जेणेकरून असे प्रकार आपण आपल्या स्थानिक पातळीवर टाळू शकू आम्ही खाली सही करणारे लोक हे पालक म्हणून आपल्या आपल्याकडे आलेलो आहोत व आमचं म्हणणं मांडत आहोत. आमच्या आमच्या निवेदनाची लवकरात लवकर दखल घेतली जाईल अशी आशा आम्ही करतो.त्यावेळी अभिलाष बोरकर, गोकुळ सोनार,दीपक माने यांनी प्रातिनिधीक स्वरूपात पालकांच्या भावना मांडला सदर भावना ह्या शासनापर्यंत पोहचविण्याची विनंती केली.

याप्रसंगी शरद मिस्तरी, दत्ता सोनार, अमोल ठाकूर, प्रविण चौधरी, गणेश पांडे, सुनैना बोरकर, पल्लवी माने, निशा पांडे, दिपाली सोनार, राधिका सोनार, सलोनी कुकरेजा, प्रतिभा पाटील, आशा पाटील, सुषमा ठाकूर, अश्विनी मार्कंड्ये, मनोज सोनार, प्रमोद नावरकर, संदिप सिसोदिया, प्रशांत येवले ,दत्तात्रय सोनार , रामचंद्र कुकरेजा, तुळशीदास पटेल, विनोद मार्कंड्ये, बापू पाटील, फिरोज देशमुख ,भावेश पाटील ,दिनेश पाटील, समाधान महाजन, प्रवीण मोरे, सचिन पाटील, योगेश जागीरदार, संदीप पाटील, दिनेश पाटील आदी सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!