आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व यंत्रणांनी मंजुर कामाच्या 100 टक्के वर्क ऑर्डर 31 सप्टेंबर पर्यत पूर्ण कराव्यात – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील शाळामध्ये सी.सी.टी.व्ही लावण्याची सूचना राज्य शासनाने दिली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील गरिबांचे मुळे जिल्हा परिषद शाळेत शिकतात तिथे सी.सी.टी.व्ही लावणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आढावा बैठकीत दिली.

पुढे त्यांनी सांगितले की ,आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व यंत्रणांनी मंजुर कामाच्या 100 टक्के वर्क ऑर्डर 31 सप्टेंबर पर्यत पूर्ण कराव्यात असे निर्देश देऊन सन 2024-25 अंतर्गत दिनांक 5 सप्टेंबर 2024 पुर्वी जिल्हा परिषदेने उरवरित 100 टक्के कामांना प्रशासकीय मान्यता द्याव्यात अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

शासकीय यंत्रणांनी दिनांक 31 ऑगस्ट पर्यत 100 टक्के कामांना प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती कार्यालयाकडे सादर करावेत जेणेकरुन आचारसंहितेपुर्वी कामे कार्याआरंभ आदेश देऊन कामं सुरु करता येऊ शकतील.कामांचे प्रस्ताव शासनाकडे तात्काळ सादर करण्याच्या सूचना देऊन मंजूर कामे दर्जेदार व मुदतीत पुर्ण करुन प्रशासकीय दिरंगाई व कामाच्या गुणवत्तेतील चालढकल खपवून घेतली जाणार नाही असे सांगून जिल्ह्यातील ओ.डी.आर. आणि व्ही.आर. रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी च्या कामांचे प्रस्ताव शासनाकडे तात्काळ सादर करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.तसेच महावितरण,वनविभाग,अंगणवाडी बांधकामे, कौशल्य विकासची कामे,परिवहन विभाग यांच्याकडील कामे तात्काळ मार्गी लावावे, असे ही आदेश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व विभागाच्या कामाचे सादरीकरण करून विविध विभागांना कामाचा वेग वाढविण्याची सूचना दिली.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित,अपर मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सूर्यवंशी,जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे,समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!