अमळनेर प्रतिनिधी,तालुक्यातील सर्व नागरिकाना संजयगांधी योजना तहसील कार्यालय अमळनेर यांच्याकडून कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासन निर्णयानुसार संजय गांधी योजने अंतर्गत श्रावण बाळ व संजय गांधी या योजनेचा
लाभ घेणाऱ्या लाभार्थीना माहे जुन 2024 पासून दर महा 1500 /- रूपये प्रमाणे
मिळणारे वेतन हे लाभार्थ्याच्या बँक खात्यात DBT ब्दारे जमा होणार आहे व असे
महाराष्ट्र शासन यांचे परिपत्र आले असून ज्या लाभार्थ्यांची बँक खाते DBT केलेले नसेल त्यांना दरमहा मिळणारे वेतन मिळण्यापासून वंचित राहावे लागेल.तरी लाभाथीं यांनी तात्काळ आपले आधार कार्ड ला मोबाईल नंबर व जन्म तारीख पुर्ण नमूद करून अपडेट केलेले आधार कार्ड लाभ मिळणाऱ्या बैंकेत जाऊन त्या बैक खात्याला लिंक करून DBT करून घ्यावे व DBT केल्याचा सही, शिक्का मारून तहसिल कार्यालय अमळनेर येथे संजय गांधी योजना या
शाखेत लवकरात लवकर अपडेट केलेले आधार कार्डची प्रत, बॅँक खाते पासबुकची प्रत, मंजुरी प्रत्राची प्रत,शाळेचा किंवा जन्म दाखल्याची प्रत इत्यादी कागदपत्रे जमा करावे. तसेच ग्रामीण भागातील लाभार्थीं यांनी तलाठी कड़े जमा करावे,अश्या आशयाचे आवाहन अमळनेर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.