अमळनेर येथील समाज कार्य महाविद्यालयात महामानव क्रांतीसुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली अर्पण करणेत आली.
याप्रसंगी विद्यार्थी कीर्ती सोनवणे, रत्ना खैरनार, ब्रदर क्रिस्टो, मयुरी बोरसे यानी गीत, मनोगत याद्वारे आदरांजली वाहिली.याप्रसंगी विभाग प्रमुख डॉ. जगदीश सोनवणे यानी बाबासाहेब आंबेडकराचा जीवन संघर्ष विद्यार्थ्यांसमोर मांडला.प्राचार्य डॉ पी एस पाटील अध्यक्षस्थानी होते.
सूत्र संचालन मोहिनी पाटील , तेजस्विनी पाटील व आभार प्रदर्शन उत्कर्षा पवार यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ अस्मिता सोनवणे, डॉ अनिता खेडकर, प्रा विजयकुमार वाघमारे, डॉ भरत खंडागळे डॉ सागरराज चव्हाण डॉ श्वेता वैद्य व विदयार्थी उपस्थीत होते.