अमळनेर येथील प्रतापनगर मधील रहिवासी असलेला तुषार चिंधु चौधरी याचा खून झाल्याचे काल पहाटे उजेडात आल्याने माजली खळबळ.
सविस्तर वृत्त असे की,तुषार चौधरी हा आपल्या कुटुंबासह शहरातील प्रताप नगर मध्ये आपल्या आई,पत्नी व दोन चिमुकल्या मुलांसह राहत होता.मात्र बरीच रात्र उलटून ही तुषार नआल्याने शोधा शोध केली असता मंगरूळ गावाजवळ धुळे महामार्गावर तुषार डोक्याला व कानाजवळ जबरदस्त मार लागलेल्या अवस्थेत आढळला.त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.
आणि सुरू झाला पोलिसांचा शोध…
पोलिसांनी मोबाईल,सीसीटीव्ही कॅमेरे आदी बाबी तपासल्या. असता तुषार एका व्यक्ती सोबत गाडीवर जातांना आढळून आला.त्या व्यक्तीचा शोध घेतला असता तो सागर नामक इसम असून दोंडाईचा येथे राहणार असल्याची पोलीस निरीक्षक विकास देवरे यांना गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पोलीस कर्मचारी कैलास शिंदे , मिलिंद सोनार , अमोल पाटील , शेखर साळुंखे , निलेश मोरे ,विनोद सदाशीशीव ,उज्वल म्हस्के , नितीन कापडणे ,प्रशांत पाटील,जितेंद्र निकुंभे , पूनम हटकर यांच्या पथकाला तपासकामी दोंडाईचा येथे पाठवले. मात्र सागर याने मोबाईल बंद करून ठेवला होता.त्याचे मोबाईल चे दुकान होते. खुनानंतर काही तासात ६ रोजीच दुपारी दीड ते दोन च्या सुमारास पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चौकशी केल्यावर प्रेम कहाणी उघडकीस आले.तुषार ची पत्नी हिचर लग्ना पूर्वी सागर सोबत प्रेम संबंध असल्याचे पुढे आले. तुषार ची पत्नी हिला सागर सोबत राहायचे असल्याचे तिने सागरला सांगितले होते.सागरने तुषारला लग्न पत्रिका वाटप करण्याच्या उद्देशाने घराबाहेर घेऊन गेला व त्याचा कायम स्वरूपी काटा काढला असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आल्याने तुषार याची अंत्ययात्रा झाल्या नन्तर पत्नी पूजाला देखील ताब्यात घेण्यात आले खुनाचा तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे करीत आहेत.