धुळे येथील नवलनगर के.एन.बी कला महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या मार्फ़त संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकरनां त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिली मानवंदना.
सविस्तर वृत्त असे की, संविधान निर्माते तथा बहुजन समाज उद्धारक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनाला नवलनगर के.एन.बी कला महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या मार्फ़त उपस्थित प्राध्यापक वृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी दिली मानवंदना.
या प्रसंगी डॉ. ए. बी. सोनवणे यांनी मार्गदर्शन करतांना त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या जडणघडणीत संविधान निर्मिती चे महान असे कार्य केल्याचे महत्व सांगितले.
तर अध्यक्षीय भाषण डॉ.व्ही. एच.उभाळे सर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील बहुजन समाजाला शिक्षणाचा मूलमंत्र दिल्याचे सांगितले.
कार्यक्रम आभार प्रदर्शन प्रा.एस डी सूर्यवंशी सर यांनी केले.
याप्रसंगी प्रा डॉ.एन झेड पाटील, डॉ. एस जे पाटील, प्रा डॉ यु वाय गांगुर्डे,डॉ. के डी. बागुल, प्रा.छाया पाटील, डॉ. सुजाता निकम, डॉ. संभाजी कदम, प्रा प्रमोद पाटील, प्रा.व्ही बी शिंदे सर ,प्रा. एस.डी सूर्यवंशी सर प्रा. बोरसे, संभाजी पाटील,रवींद्र धनगर,संतोष पाटील,रोहिदास पाटील,संजय पवार, योगेंद्र राजपूत यासह विद्यार्थी उपस्थित होते