अमळनेर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जयंती निमित्त मान वदंना देण्यासाठी उसळला महासागर.
संविधान निर्माते, विश्वरत्न, करुनेचा सागर, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने त्यांना मान वंदना देण्यासाठी शहरातील गांधलिपुरा भागातील पूर्णकृती पुतळ्या जवळ सकाळी लोकप्रतिनिधी आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, डॉ बी एस पाटील, पोलीस उप विभागीय अधिकारी विनायक कोते, परी.पोलीस उप विभागीय अधिकारी केदार बारबोले, तहसीलदार रुपेशकुमार सुराना,आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे,डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष नगरसेवक नरेंद्र संदानशिव,प्रा डॉ विजय तुंटे,महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय उपाध्यक्ष डॉ विजय गाढे, तालुका अध्यक्ष समाधान मैराळे, कामगार संघटनेचे सोमचंद संदानशिव आदिच्या उपस्थिती मध्ये भारतीय बौद्ध महासभेचे बापूराव संदानशिव,गायकवाड सर,सिद्धार्थ सोनवणे, अशोक बिऱ्हाडे, मंगलताई सोनवणे आदींनी बुद्ध वदंना घेतली. त्यानंतर मान्यवराच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. यावेळी समता सैनिक दलाचे सुनील करंदीकर यांनी बाबासाहेब यांच्या नावाचा जयघोष केला. घोषणानी परिसर दुमदूमला.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रा डॉ विजय खैरनार, डॉ राहुल निकम, प्रा विजय वाघमारे,सामाजिक कार्यकर्ते योगराज संदानशिव,ज्येष्ठ विधीतज्ञ ऍड विजय धिवरे, ऍड श्रावण ब्रम्हे,ऍड शिवकुमार ससाने, रणजित बिऱ्हाडे, ऍड अविनाश खैरनार,प्रा भुसणार, डॉ हर्षवर्धन जाधव, प्रा भानुदास गुलाले, डॉ योगेश नेतकर,ज्ञानेश्वर संदानशिव, विजय संदानशिव, अर्जुन संदानशिव, अरविंद बिऱ्हाडे, गौरव सोनवणे, विशाल सोनवणे, रामराजे,दिनेश बिऱ्हाडे,प्रवीण बैसाणे, किरण बहारे, अविनाश संदानशिव, राहुल बिऱ्हाडे, अतुल डोळस, तुषार संदानशिव, शंकर बैसाणे, मिलिंद निकम आदी उपस्थित होते.
शरहरातील विविध भागातुन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची सजावट केलेले रथ आकर्षण ठरले. डीजे च्या तालावर शहारातील ताडेपूरा भागातील भीम नगर च्या पंचशील युवक मंडळात बहुसंख्य महिला व तरुण वर्ग आनंद उत्सव साजरा करतांना दिसला,पैलाड, फरशी रोड आंबडेकर नगर, प्रबुद्ध कॉलनी व बंगाली फाईल येथील समाज बांधवानी मिरवणूक काढून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवन्दना दिली.
विशेष बाब म्हणजे सर्व मिरवणुका या मोठ्या उत्सहात व शांततेत पार पडल्या.
सदरच्या आनंद उत्सवाला गलबोट लागू नये व शांततेत पार पडावा म्हणून अमळनेर डीवायएसपी विनायक कोते, परी.डीवायएसपी केदार बारबोले, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलीस अधीक्षक रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक सुनीता नेरकर यांचे मार्गदर्शन घेऊन एपिआय रविंद्र पिंगळे, पीएसआय राजु जाधव,पीएसआय भगवान शिरसाठ,पीएसआय युवराज बागुल, पीएसआय नामदेव बोरकर,हेडकॉ मिलिंद पाटील, सिद्धान्त सिसोदे,अमोल पाटील,गणेश पाटील,विनोद संदानशिव, मिलिंद सोनार, संदीप धनगर,राहुल चव्हाण, शिंदे,सुनील महाजन, अशोक साळुंखे,आरटीओ राजेंद्र कोठावदे, सचिन पाटील, विलास बागु, निलेश मोरे या सह एकूण पोलीस अंमलदार – ५२,दंगा नियंत्रण पथक – ०१ व होमगार्ड – ५७ आदींनी अथक परिश्रम घेतल्याने समाज बांधवानी त्यांचे मनापासुन आभार मानले.