अमळनेर येथे दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी कै.सु.आ.पाटील माध्य.विद्या. पिंपळे बु !! येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.”
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक नानासो.श्री.डी.बी पाटील सर यांनी केले. श्री एम पी निकम सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजसुधारणा, कायदा आणि संविधान तसेच शिक्षण या कार्यांवरती प्रकाश टाकला. श्रीमती.शिरसाठ मॅडम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी योगदान विषयी मत मांडले.
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक बापूसो श्री. सी.एन.पाटील सर यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांच्या शिक्षणातील योगदानावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. भाषण मध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निकम सरांकडून ” पेन “बक्षीस म्हणून देण्यात आले. या प्रसंगी शिक्षकेत्तर कर्मचारी अंकुश पाटील,तसेच विद्यार्थी उपस्थित होते.