अमळनेर येथील श्रीमती डी.आर कन्या शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस.सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक व्ही.एम. कदम उपस्थित होते. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पण व पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती आर.एस. सोनवणे यांनी जय भिम कुणी म्हणावे व श्रीमती पी. डी.शेवाळे यांनी आपल्या भाषणात बाबासाहेब यांचा जीवनपट मांडला. शाळेच्या मुख्याध्यापिका एस. एस. सूर्यवंशी यांनी अध्यक्षीय भाषण केले.त्यावेळी बी. एस.पाटील,करुणा क्लबचे डी.एन.पालवे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीमती पी.व्ही.साबे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींनी परिश्रम घेतले.