अमळनेर येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त आई जिजाऊ अभ्यासिका अंमळनेर यांनी आयोजित केलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण सोहळा हाशमजी प्रेमजी कॉम्प्लेक्सच्या येथे संपन्न झाला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी एस पाटील, विभाग प्रमुख डॉ जगदीश सोनवणे, धनदाई महाविद्यालयाच्या डॉ भाग्यश्री वानखेडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नाशिक विभागीय उपाध्यक्ष प्रा डॉ विजय गाढे, तालुका उपाध्यक्ष प्रवीण बैसाने,प्रा धनराज ढगे, पवन लोहार ,हर्षल भोसले, दीपक पाटील,अमोल सातपुते ,सोमेश राजपूत ,सुवर्णदीप राजपूत या मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
प्रसंगी डॉ भाग्यश्री वानखेडे व प्रा डॉ विजय गाढे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षणात महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणा विषयीचे महत्व विषद केले.
सामान्य ज्ञान परिक्षेत तन्वी चंद्रशेखर सूर्यवंशी या विद्यार्थिनीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून रोख रुपये तीन हजार, सन्मानचिन्ह, संविधान पुस्तक,प्रमाणपत्र डॉ जगदिश सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले .
द्वितीय क्रमांकाचे बक्षीसहर्षवर्धन सुरेश पाटील रोख रुपये 2000, ट्रॉफी, प्रमाणपत्र, संविधान पुस्तक पवन लोहार यांच्या हस्ते देणेत आले.
तृतीय क्रमांकाचे बक्षीस शबनम ताकारी , एक हजार रुपये रोख, ट्रॉफी,प्रमाणपत्र, संविधान पुस्तक, तर उत्तेजनार्थ नंदिनी पाटील, नूरफातिमा कुरैशी यांना रुपये पाचशे रोख, संविधान पुस्तक, प्रमाणपत्र देण्यात आले.
यशस्वितेसाठी विशाल घिसाडी, देविदास घोलप, गौरव वानखेडे, हेमंत बडगुजर, मयूर चौधरी, रमेश घोलप यांनी परिश्रम घेतले