अमळनेर येथे 134 व्या डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त फरशी रोड डॉ आंबेडकर नगर मधील रहिवाशी विशाल सोनवणे यांनी आपले वडील बौद्धवासी विजय युवराज सोनवणे यांच्या स्मरणार्थ अन्नदान केले.
सविस्तर वृ असे की, दि १४ एप्रिल रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने शहरातील गांधलीपुरा भागातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी तालुक्यातील प्रचंड जनसमुदाय आला होता. अनेक जण गावाखेड्या मधून आपल्या परिवारासह आलेले होते. त्यांना विशाल सोनवणे व त्यांच्या परिवारा तर्फे लोकांना अन्नदान केले. यासाठी त्यांना विकास कुमावत , उमेश सोनवणे , मुस्तफा पठाण , शाहरुख शेख, ओम बिऱ्हाडे , कुणाल खरारे , राव पाटील ,दुर्गेश सोनवणे ,निखिल पाटील यांचे सहकार्य लाभले.