जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांपैकी एक द्वितीयांश पदे महिलांसाठी आरक्षित करण्यात येणार आहेत. यात अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला यांचा समावेश आहे. यासाठी तालुकानिहाय सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
अमळनेर तालुक्यातील 119 ग्रामपंचायतच्या सन २०२५-२०३० कालावधी साठी सरपंच पदाच्या आरक्षण बाबत सोडत दि 21एप्रिल 2025 रोजी शहरातील इंदिरा गाधी भवन येथे होणार असल्याने राजकीय पक्षाच्या पदाधिकारी तसेच सरपंच,उपसरपंच यांनी उपस्थितीचे आवाहन तहसीलदार रुपेशकुमार सुराना यांनी पत्रका द्वारे कळविले आहे.
असे असणार आरक्षित जागा….
अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे- ६, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-१४, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-२३, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-७६, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-३ , अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब-७,नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- १२ ,सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-३८ – एकूण अ ब क ड – ६०.