अमळनेर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुक प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अमळनेर शहरातील पाच मतदान केंद्र सुशोभीकरण करून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात अमळनेर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी नितीन मुंडावरे तहसीलदार रुपेश कुमार सुराणा आणि निवडणूक शाखेने पुढाकार घेतला.
अमळनेर शहरातील पाच मतदान केंद्रे सुशोभीकरण रांगोळी ,सेल्फी पॉईंट , बलून, मंडप ,डेकोरेशन इत्यादी कार्य विप्रो कंपनी आणि आधार संस्था यांनी पार पाडले.
या कार्यात विप्रोचे अधिकारी व आधार संस्थेची टीम उत्साहाने सहभागी झाली होती. वीप्रोचे विजय बागजीलेवाले सीनियर जनरल मॅनेजर, व्यंकटेश गुर्रम ,प्रॉडक्शन हेड, हरीश मोहोरे इंजिनिअरिंग हेड ,श्री जितेंद्र शर्मा क्वालिटी हेड ,आनंद निकम , एच आर मॅनेजर चेतन थोरात, सुधीर बडगुजर यांनी सहभाग दिला.
आधार संस्थेच्या डॉ. भारती पाटील अध्यक्ष, रेणू प्रसाद कार्यकारी संचालक आणि आधार संस्थेचे टीम मेंबर्स दीपक संदानशिव, अश्विनी भदाणे, मुरलीधर बिरारी, राकेश महाजन, तौसिफ़ शेख, दिपक विश्वेश्वर, संदेश संदानशिव,सायली संदानशिव, ज्ञानेश्वरी पाटील, दिप्ती शिरसाठ, योगिता पाटील, यास्मिन शेख, भावना सूर्यवंशी, उर्जीता शिसोदे, आनंद पगारे, अनुजा पाटील, विकी शिरसाठ यांनी अनमोल सहकार्य केले.