अमळनेर प्रतिनिधी,येथील विधानसभा मतदारसंघांमध्ये १६ उमेदवार रिंगणात होते. सोमवारी माघारीच्या दिवशी ४ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर आता १२ उमेदवार रिंगणात आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांची अपक्ष उमेदवार अनिल भाईदास पाटील यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरल्याने डोकेदुखी वाढली आहे. विशेष बाब म्हणजे अपक्ष उमेदवार अनिल भाईदास पाटील यांना घड्याळ सारखे दिसणारे चिन्ह म्हणजे केक हे चिन्ह मिळाले असल्याने मतदारांमध्ये काही प्रमाणात भ्रम निर्माण करू शकते.मागील लोकसभेत अनेक ठिकाणी सारखे नाव असल्याने अपक्ष उमेदवारांचा फटका बसलेला आहे.अधिकृत पक्षांच्या मतावर या सारखे नावं असलेल्या उमेदवारांनी डल्ला मारल्याचे आढळून आले. अर्थात ही विरोधकांची राजकीय रणनीती असावी.
मागील अमळनेर विधानसभा निवडणुकीत ही माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या नावा सारखे अपक्ष उमेदवार रिंगणात उभे ठाकले होते.विरोधकानां चितपट करण्यासाठीच अशी खेळी खेळली जात असल्याने मंत्री अनिल पाटील यांच्या मतावर डल्ला मारण्यासाठी सदर अपक्ष उमेदवार उभा केल्याची चर्चा होत आहे.