शहर बूथ कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात साजरा.
अमळनेर येथील विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिरीष दादा चौधरी यांच्या शहर कार्यकर्ता मेळाव्यास हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती झाला संपन्न.
सविस्तर वृत्त असे की,अमळनेर शहरातील सर्व शिरीष दादा चौधरी मित्रपरिवार आणि आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत शहरातील असंख्य तरुण कार्यकर्ते मेळावा मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकर्त्यांना रवींद्र बापू चौधरी यांनी संबोधित करताना आपले मत व्यक्त केले की, चांगली बॅटिंग करण्यासाठी आपल्याला योगायोगाने बॅट हे चिन्ह मिळाले आहे. आपल्याला ही लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही शिरीष दादाच्या पाठीमागे उभी असून शिरीष दादाने अमळनेर साठी फक्त आणि फक्त विकासच करण्याचे ध्येय ठरवले असून चाट मारायचे धंदे आम्हाला जमणार नाहीत. मागील आमदारकीच्या काळात शिरीष दादा यांनी अमळनेर साठी अंबऋषी टेकडी जवळचा रेल्वे ब्रिज, नगर परिषदेची भव्य अशी इमारत, भूतो ना भविष्य अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, अमळनेरचे जीवन संजीवनी समजले जाणारे कलाली डोह चे पुनर्जीवन करून अंमळनेरच्या नागरिकांचे जीवन सुजलाम सुफलाम करण्याचा मानस शिरीष दादा यांचा होता ,आहे, आणि राहणारच. म्हणूनच ही जनता तुमच्या रूपाने शिरीष दादांच्या पाठीमागे वेळोवेळी उभी आहे.
कोरोना काळात शिरीष दादा चौधरी यांनी रुग्णांची केलेले सेवा या चाट माऱ्या मंत्र्यावर बघवली गेली नाही, आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. आम्ही आजही सहपरिवार कोर्टाच्या चकरा मारत आहोत. कोरोना काळात घरात बसून राहणारा हा भूमिपुत्र खर आहे का ??
या चाटमाऱ्या मंत्राला याच जनतेने आमदार केले नव्हे नव्हे तर मंत्रीही केले आम्हालाही आनंद झाला. की अमळनेर तालुक्याला मंत्री पद मिळाले, परंतु पदाची एवढी गुर्मी असलेला ह्याने मागच्या वेळी भूमिपुत्र भूमिपुत्र म्हणून स्वतःचे स्वर्थ साधून घेतले. मागील काही काळात दुष्काळी परिस्थिती होती त्यावेळी दुष्काळ जाहीर केला नाही. आपल्याच बाजूचा चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला परंतु अमळनेरचं काय फक्त बॅनरवरचा विकास झाला. शहरातील विकासा संदर्भात बोलताना रवींद्र बापू चौधरी बोलले की अमळनेर शहरात तालुक्यात कोणते कामे झाले आहेत त्यांनी दाखवून द्यावेत. अमळनेर तालक्यात शाश्वत विकासाच्या नावावर कोणतेही काम झालेली नाहीत. अमळनेर तालुक्यात फक्त रस्त्यांचीच कामे झाले आहेत. तर का ? खडी त्याची रेती त्याची डांबरही त्याचे कमिशन ही तोच खातो म्हणूनचं. रस्त्यांची कामं झाली या व्यतिरिक्त अमळनेर तालुक्यात कोणतेही विकास काम झाली नाहीत. भूमिपुत्र भूमिपुत्र म्हणून घेणाऱ्या या भूमिपुत्राचा जन्म झालाय तरी कुठे ? याचा जन्म भडगाव तालुक्यात झाला असून. आम्हीच खरे इथले भूमिपुत्र आहोत, आमचा जन्म अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथे झाला आहे. असे रवींद्र बापू चौधरी यांनी सांगितले.
पुढे बोलताना आरिफ भाया म्हणाले की कोरोना काळात शिरीष चौधरी यांनी कोरोना योद्धा म्हणत यांचे कामाचे कौतुक केले तेवढे कमीच त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला गेला त्यांनी चांगले काम या मतदारसंघात केले आहेत असे ते बोलले. तर ज्या टक्केवारी कोराना त्यांचे टक्केवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असा आरोप त्यांनी मंत्री अनिल पाटील यांच्यावर केला. पुढे त्यांनी मुक्तार खाटीक यांच्यावर टीका करताना असे म्हटले की जाग उठा पोपटलाल. गुलाबराव बापू यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कार्यकर्त्यांना संबोधित करताना आपल्याला सर्वांना शिरीष दादा चौधरी यांना आमदार म्हणून बघायचे आहे योगायोग बघा आपल्याला बॅट हे चिन्ह मिळाले आहे. त्याच बॅटने षटकार लावून विरोधकांना घरी पाठवू. माझ्या तालुक्यातील मंत्राला प्रचारासाठी एका खेड्यातून नवे नवे प्रत्येक खेळातून हाकलून लावण्याचे सत्र सध्या सुरू आहे. विकासाच्या नावाचे भुलताप्पा मारणाऱ्यांना जनता हाकलून लावते याची प्रचिती तुम्हाला आलेच असेल. अमळनेर नगरपरिषदेची 900 रुपये असलेले पाणीपट्टी 1800 रुपये केली अमळनेरच्या नागरिकांना हे सांगण्याची गरज नाही. ते तुम्हाला तुमची योग्य जागा नक्कीच दाखवतील. यावेळी शहरातील अर्बन बँक चेअरमन मोहन भाऊ सातपुते, महाजन समाज अध्यक्ष मनोहर महाजन सर, मुस्लिम समाज अध्यक्ष हाजी साहेब, मा. नगरसेवक सलिम टोपी, दादा पवार, श्रीराम चौधरी, सुरेश चौधरी, चंद्रकांत साळी, बबली पाठक, गुलाब पाटील,गोरख तात्या, नाना धनगर, रमेश देव, चंद्रकांत कंखरे, आरिफ भाया, गुलाम नबी, फिरोज पठाण, नविद शेख, पांडुरंग महाजन, भाऊसाहेब महाजन, धनु महाजन, पंकज चौधरी, बाळासाहेब संदानशिव, दिपक चौघुले, अबु महाजन, गणेश महाजन, भरत पवार, किरण बागुल, ॲड सुरेश सोनवणे, कैलास पाटील, कैलास भील, नरेश कांबळे, महेश जाधव, अमोल भावसार, राम लखन, जयंत पाटील, अवि जाधव, प्रविण सातपुते, शुभम यादव, पराग चौधरी, मनोज शिंगाने, पंकज भोई, किशोर पाटील, संतोष पाटील, बिंदू सोनवणे, सुनिल भामरे, सुनिल भोई, विजय भोई व शहरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.