समाज कार्य महाविद्यालयातील सागर कोळी विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित…

अमळनेर येथील समाज कार्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सागर कोळी याना विद्यापीठ स्तरावर उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव राष्ट्रीय सेवा योजना कार्यगौरव सोहळा २०२३-२४ पार पडला.राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विद्यापीठ संलग्न क्षेत्रात निस्वार्थ भावनेने व निष्ठेने सेवा करणाऱ्यांना त्यांच्या अंगिकृत कामास प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या निस्वार्थ सेवेचा येथोचित गौरव करणाऱ्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय आव्हान २०२५ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिबिरात अमळनेर येथिल पंडित जवाहर नेहरू समाजकार्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनाचा स्वयंसेवक सागर सुकदेव कोळी यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली या निमित्ताने दि.२६ रोजी रासेयो, कबचौ, उमवि जळगाव संचालक डॉ.सचिन नांद्रे यांच्या हस्ते सागर सुकदेव कोळी यांना उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे,केंद्रीय अध्यक्ष प्रा.व्ही.एल.माहेश्वरी कुलगुरू कबचौ उमवि, प्रा.एस. टी.इगंळे प्र-कुलगुरू, कबचौ उमवि,जळगाव, राजेंद्र नन्नवरे राज्यपाल नियुक्त व्य.प.सदस्य कबचौ उमवि जळगाव डॉ.विनोद पाटील कुलसचिव कबचौ उमवि जळगाव, संचालक रासेयो डॉ.सचिन नांद्रे हजर होते.

संस्थाध्यक्ष अभिजीत सुभाष भांडारकर, प्राचार्य डॉ पी एस पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा. विजयकुमार वाघमारे, डॉ. अनिता खेडकर, प्रा उदय महाजन आणि शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!