अमळनेर प्रतिनिधी , येथे सतत पावसाने शेतकऱ्यांचा खरीपाचा हंगाम संकटात असल्याने व राजकोट मधील शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने तो कोसळल्याच्या निषेधार्थ किसान काँग्रेस तर्फे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य गृह परिसरातील पुतळ्यासमोर व महाराणा प्रताप चौकात किसान निषेध आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहजवळ निषेध म्हणून काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी करण्यात आली. तर सलग अडीच महिन्यांपासून पावसाच्या रिपरिप मुळे खरीप हंगाम धोक्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल. म्हणून तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाचे झालेले निकृष्ट बांधकामांमुळे कोसळला असल्याने संबधित ठेकेदार व संबंधित खात्याचे मंत्री यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदन द्वारे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना करण्यात आली.
रिपरिप पावसामुळे नुकसान….
पावसामुळे मुग, उडीद, मका, बाजरी, ज्वारी कापूस, सोयाबीन यासह अनेक पिकांचे नुकसान झालेले असुन खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातुन गेलेला आहे. तसेच कापूस पिकांवर सर्वत्र मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. सर्वत्र शेतात पाणी साचले असल्याने पिक पुर्णपणे अकार्यक्षम झालेले आहेत. यामुळे कापूस पिकाला धोका निर्माण झाला आहे .
यासत्व सरकारने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा. व केवळ ८ महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदार व त्या खात्याचे मंत्री यांच्यावर कडक कारवाई करावी, अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,या आशयाचे निवेदन किसान काँग्रेस सेलने दिला आहे.
या प्रसंगी किसान सेलचे तालुका अध्यक्ष प्रा सुभाष पाटील, सुरेश पाटील, डॉ. अनिल शिंदे,धनगर पाटील, नीलकंठ पाटील, महेश पाटील, प्रवीण जैन, त्र्यंबक पाटील, दीपक शिसोडे, बन्सीलाल भागवत, प्रताप पाटील, मुन्ना शर्मा, सुनिल पाटील, कैलास पाटील यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.