अंमळनेर प्रतिनिधी,येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वतीने समाजातील विविध समस्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अंमळनेर तहसीलदार यांना देण्यात आले.
सदर निवेदनात समाजातील विविध घटकांचे रोजचे जगणे दिवसेंदिवस गंभीर होत चाललेले आहे,त्यांच्या समस्या तीव्र झालेल्या आहेत.महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील जनता विविध संकटांचा मुकाबला करीत आहे.शहरी व ग्रामीण भागातील रोजगाराचा प्रश्न अत्यंत गंभीर झालेला आहे. रोजगाराच्या संधी नसल्यामुळे ग्रामीण जनता शहराकड़े स्थलांतरित होत आहे.शेतीवरील वाढत्या आरीष्ट्य मुळे शेतकऱ्या सह शेतमजूर, ग्रामीण कारागीर व शेतीवर अवलंबून असलेले ग्रामीण कष्टकरी त्रस्त झालेले आहेत. रोजगाराची हमी देणारी मनरेगा किंवा रोहयो योजना बहुतांश ठिकाणी खिळखिळी झालेली आहे. शहरी भागातील बेरोजगारीने ही कळस गाठलेला आहे. उद्योगधंदे बंद पडत चालल्यामुळे असंघटित क्षेत्र वाढत चाललेले आहे. कुठल्याही प्रकारची सेवा सुरक्षा या क्षेत्रातील श्रमिकाना नाही. सुशिक्षित उच्चशिक्षित तरुण देखील बेरोजगारीने त्रस्त झालेला आहे.केंद्र सरकारच्या नोकऱ्या मधील साडेनऊ लाख जागा रिक्त आहेत. याशिवाय राज्य सरकारच्या सेवेतील ही हजारो जागा रिक्त आहेत.बेरोजगार तरुणांची रोजगाराची संधी त्यामुळे हिरावून घेतली जात आहे.गावा गावातील व शहरी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा,महानगरपालिकांच्या शाळा पुरेशा कर्मचाऱ्या अभावी शिक्षण देण्याच्या मूळ उद्देश उद्देशपासून दूर जात आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये पुरेशे शिक्षक नाहीत,महाविदयालये, विदयापीठात रिसर्च फेलोच्या, पीएचडीच्या जागा कमी-कमी केल्या जात आहेत. प्राध्यापकांची शेकड़ो पदे रिक्त आहेत.उच्च शिक्षण संस्थांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची घूसखोरी वाढत चाललेली आहे.अभ्यासक्रमातील बदलाच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्राचे सांप्रदायिक करण वाढत चाललेले आहे, या सह अनेक समस्यांकडे सरकारने लक्ष देऊन उपाय योजना करावी,अश्या आशयाचे निवेदन भारतीय कम्यनिस्ट पक्षाच्या वतीने 30 ऑगस्ट रोजी अंमळनेर तहसीलदार श्री रूपेशकुमार सुराणा यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी प्रभुदास कसबे,जिजाबाई सोनवणे,सरफराज,शरा हिम्मतराव,चंदुलाल जेठवा,दिपक पारधी आदी उपस्थित होते.