आयुक्त निवेदन घेण्यासाठी कार्यालयात नसल्याने आंदोलकांनी अधिका-यांना घेराव घालत धरले धारेवर….
जळगाव प्रतिनिधी,येथील शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील समस्याग्रस्त नागरिकांनी जळगाव महापालिकेचे नगरसेवक,आयुक्त व अधिका-यांच्या विरोधात आक्रोश मोर्चा महापालिकेवर काढला. या मोर्चाचे नेतृत्व मा. सुनिलभाऊ देहडे (जळगाव शहर संयोजक बहुजन क्रांती मोर्चा) यांनी केले.
प्रभाग क्रमांक १ मधील सर्व जुन्या व नवीन वसाहतीतील नागरिक प्रामाणिकपणे कर भरत असुनही त्यांना मुलभुत सुविधा देखील महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या नाहीत.या प्रभागातील नगरसेवक या भागात कधी ढुंकुन देखील पहात नाहीत.या नगरसेवकांबद्दल नागरिकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत.महापालिका आयुक्त, अधिकारी,महापौर,नगरसेवक यांना वारंवार निवेदन देऊनही त्यांनी कोणत्याही प्रकारच्या मुलभुत सुविधा दिलेल्या नाहीत.साफ दुर्लक्ष केलेले आहे.
प्रभाग क्रमांक १ मधील गट क्रमांक ३६३ व ३७२ मधील खडे प्लॉटचा सर्वे न करणे, गुंठेवारी न करणे,प्रभाग क्रमांक १ मधील वसाहतीमधील खराब रस्ते,अद्यापही कच्चे रस्ते,या परिसरात वाढलेले प्रचंड गवत,खड्डे व खड्ड्यात साचलेले पाणी,या पाण्यात निर्माण झालेले डास,या डासांमुळे मलेरिया व डेंग्यू सारखे होणारे रोग,काही भागात अमृत योजनेची पाईपलाईनच नाही,म्हणजे नागरिक पाण्यापासुनही वंचित आहेत,सेफ्टी टॅंकमधुन वाहणारे पाणी व त्यामुळे निर्माण झालेली दुर्गंधी, पथदिव्यांचा लपंडाव,मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट,अशा अनेक समस्यांमुळे नागरिक हैराण झाल्यामुळे व सहनशीलतेचा अंत झाल्याने आज या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले.जळगाव महापालिका उपायुक्त मा.चाटे साहेब,सहाय्यक उपायुक्त अश्विनी गायकवाड मॅडम,व इंजि.अमृतकर यांना सुनिलभाऊ देहडे,विक्की बागुल,जीवन बोरसे व महिला कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.
निवेदन घ्यायला आयुक्त येणार नाहीत असे कळल्यावर बहुजन क्रांती मोर्चाचे कार्यकर्त्यांनी उपस्थित अधिका-यांना धारेवर धरत घेराव घालत निषेधाच्या घोषणांनी महापालिका परिसर दणाणुन सोडला.
या मोर्चात सहभागी झालेले मान्यवर पुढीलप्रमाणे….
विकी बागुल, भिमराव बि-हाडे,उखा पवार,विलास शेटे,मयुर साळुंखे,जीवन बोरसे,छोटुभाऊ(सायकलवाले),प्रशांत कोळी,सागर दांडगे,सचीन कोळी,आबा गुरूजी, मच्छिंद्र भोई,प्रभाकर साबणे,श्रावण सोनवणे,सुकदेव गावंडे,अर्जुन भगत,कल्पनाताई सपकाळे,आशाबाई चौरे,छायाताई पाटील,रत्नाताई गुजर,सुरेखाताई गायकवाड,सुनिताताई पवार,संगिताताई बहाटे,संगिताताई पाटील,विमलताई पाटील,पद्माताई पाटील,अल्काताई पाटील,संध्याताई कोचुरे,संगिताताई देहडे,सुलाबाई साबणे,बबता चव्हाण,आदि मान्यवर सहभागी होते.
मोर्चा यशस्वी करण्यासाठी सुमित्र अहिरे, राजेंद्र खरे,देवानंद निकम,विजय सुरवाडे, सुनिल सोनवणे,भागवत सपकाळे,भागवत जाधव,अकीलभाई कासार,सागर दांडगे,व प्रभागातील सर्वच बंधु व भगिनींनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.