अमळनेर प्रतिनीधी येथील आक्काई बहूउद्देशीय संस्थे तर्फे हेडावे येथील गरजू लोकांना कपडे वाटप करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की,आक्काई बहूउद्देशीय संस्थे तर्फे वर्षभर सामाजिक हित साधण्याचे उद्दिष्ट ठेवून विविध उपक्रम राबविले जाते.याचाच एक भाग म्हणून येणारा हिवाळ्याच्या कडाकाच्या थंडी पासून बचाव व्हावा म्हणून हेडावे येथील गरजू लोकांना कपडे वाट करण्यात आले.
या प्रसंगी आक्काई सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री.अक्षय बाविस्कर यांनी सांगितले की,सदर उपक्रमात लोकांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत.त्याना यापुढे देखील अशीच मदत करत राहू असे सांगण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्था उपाध्यक्ष सुशांत ढिवरे, सचिव. राहुल बाविस्कर आदींनी मेहनत घेतली.
याप्रसंगी आक्काई सामाजिक बहूउद्देशीय संस्था चे सर्व पदाधिकारी तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. उपस्थित गावकऱ्यांनी आक्काई सामाजिक बहूउद्देशीय संस्थेचे आभार मानले.