सोशल मिडीया व यू-व्यूबर्सना दरदिवशी जाहिरातीचे प्रमाणिकरण बंधनकारक…जिल्हा प्रमाणीकरण माध्यम संनियत्रण समिती,जळगाव

 

जळगाव,विधानसभा घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणताही राजकीयपक्ष, निवडणूक उमेदवार,इतर कोणतीही संस्था किवा व्यक्ती यानी मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशी वृत्तपत्रातील राजकीय जाहिरात करावयाची असल्यास जाहिरातीचा मजकूर जिल्हा प्रमाणीकरण माध्यम संनियत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व- प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे.तथापि,सोशल मिडीया, यू- त्यूबर्स याना प्रचाराच्या दिवसापासून मतदाना पर्यतच्या सर्व जाहीराती, मुलाखती आदीच्या प्रसारणा साठी प्रत्येक बाबीचे प्रमाणिकरण बधनकारकआहे.

जिल्ह्यात २० नोव्हेबर रोजी एकाच टप्यात मतदान होणार आहे.त्यानुसार १९ व २० नोव्हेबरला वृत्तपत्रात प्रसिद्ध होनाऱ्या जाहिराती पूर्वप्रमाणित करून घ्याव्या लागणार आहेत. पूर्व- प्रमाणीकरणा साठी समितीकडे तीन दिवस आधी अर्ज सादर करावा लागतो. त्यानुसार मतदाना पूर्वीचा व मतदानाच्या दिवसासाठी अनुक्रमे शुक्रवार व शनिवारपर्यंत अर्ज येणे आवश्यक आहे. प्रमाणीकरणाचे अर्ज एक खिड़की कक्ष, तसेच जिल्हा माहिती कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात माध्यमांमध्ये प्रकाशित करु नये, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत.सोशल मिडीया व यू-ट्यूबर्सना दर दिवशी प्रमाणिकरण बंधनकारक. उमेदवाराची जाहीरात,तसेच मुलाखत निवडणुक संदर्भातील कुण्या एका उमेदवारांबाबत विश्लेषण, त्यांची विधाने, चलचित्र आदीसाठी सोशल मीड़िया, यू- टूबर्स आदींना प्रत्येक बाबीचे दरदिवसी प्रमाणिकरण करणे बधनकारक आहे.वृत्तपत्रात प्रकाशित जाहीरातीसह अन्य बाबीदेखील अपलोड़ करण्यासाठी त्यांना परवानगी अर्थात प्रमाणिकरण करावे लागणार आहे. सोशल मिडीया व यू-व्यूबर्सना दरदिवशी प्रमाणिकरण बंधनकारक असल्याचेही प्रशासनाकडून सागण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!