अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार, जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे मा. शिरीषदादा चौधरी यांचा वाढदिवस दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी इंदुमाई निवास, स्टेशन रोड येथे साजरा करण्यात आला. सायंकाळी ६ वाजता सुरू झालेला हा अभिष्टचिंतन सोहळा रात्री उशिरापर्यंत प्रेमाच्या आणि शुभेच्छांच्या वर्षावात पार पडला.
अमळनेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या वाढदिवसाला तालुक्यातील व तालुका बाहेरील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, माजी नगरसेवक, तालुक्यातील राजकीय पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते, विविध समाजाचे पंच सदस्य, पत्रकार, डॉक्टर, अधिकारी मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी जणू काही चढाओढ करीत असल्याचे चित्र उभे राहिले होते.
तालुक्यातील एकमेव वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा होतो, अशी चर्चा जन माणसात होताना दिसली.
विशेष बाब म्हणजे शिरीष चौधरी यांना शुभेच्छा देण्यासाठी उबाठाचे लोकसभेचे माजी उमेदवार करण पवार यांनी आपल्या व्यस्त कामाकाजातून वेळ काढून प्रत्यक्ष गळाभेट घेऊन भावी वाटचालीस मनापासुन शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देताना टायगर अभी जिंदा हें च्या घोषणा देऊन येणाऱ्या स्थानिक संस्थेच्या होणाऱ्या निवडणुकीत मोठा विजय हाशील करण्याचा निर्धार व्यक्त केला.
शुभेच्छा स्वीकारत माजी आमदार शिरीष चौधरी यांनी उपस्थितांचे मनापासून आभार मानत मतदारांना आस्वासित करताना बोलले की, तालुक्यातील सर्व मतदार माझ्या वर जो विश्वास दाखवत आहे त्याला तडा जाऊ देणार नाही. आपल्या वर येणारे संकट हें माझे समजून ते पूर्ण ताकदीने नष्ट करेल, याची ग्वाही देतो. आपला तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी मी कट्टीबध आहे.