अमळनेर येथील स्वातंत्र सेनानी अल्लामा फजले हक खैरबादी स्टडी सेंटर आणि पब्लिक लायब्ररी तर्फे ईद मिलन शीरखुर्मा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सविस्तर वृत्त कि, अमळनेर मध्ये संत,महंत तथा क्रांतीकारकांच्या विचारांचा वास करतो. त्यामुळे तालुक्यात सामाजिक एकोपा राखण्यात मदत मिळते. मात्र राजकारण्यांनी आपल्या स्वार्था साठी दोन धर्मात तेढ निर्माण करण्याची संधी सोडत नाही. अश्यातही स्वातंत्र सेनानी अल्लामा फजले हक खैरबादी स्टडी सेंटर आणि पब्लिक लायब्ररी, पत्रकार व काही सामाजिक सलोखा राखणाऱ्या व्यक्ती सह संघटना सामाजिक बंधूभाव राखण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात.
अश्यातच हिंदू धार्मियांचा गुडी पाडवा व मुस्लिम बांधवाचा पवित्र सण ईद शांततेत पार पडले. सदरचे सण आनंदात व उत्सहात पार पडावे म्हणून पोलीस प्रशासनाला वारंवार आवाहन करावे लागले.
स्वातंत्र सेनानी अल्लामा फजले हक खैरबादी स्टडी सेंटर आणि पब्लिक लायब्ररी तर्फे ईद ए मिलाद च्या निमित्ताने ईद मिलन शीरखुर्मा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी माजी आमदार, पोलीस अधिकारी, राजकीय सह सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
लायब्ररीचे अध्यक्ष मोलाना रियाज शेख यांनी प्रस्तावनेत सांगितले की, या देशासाठी अनेक मुस्लिम बाधवानी रक्त सांडले आहे. स्वातंत्र मिळविण्यात मुस्लिमांचा बरोबरीचा वाटा आहे. या देशाचे मुस्लिम व हिंदू हें दोन सुंदर असे डोळे आहेत.
या कार्यक्रम प्रसंगी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि,अमळनेर ही संताची भूमी, क्रांती कारकाची भूमी आहें. येथील दोघे समाज बांधव समाजदार असल्याने शांतता नांदत आहे.
अमळनेर डिवायएसपी विनायक कोते यांनी संबोधन करतांना सांगितले की, पोलिसांची खाकी वर्दी ही भगव्या सह सर्वच रंग अंगावर घेत वेळ प्रसंगी सर्वांचे झेंडे हातात घेऊन सामाजिक सलोखा राखण्यासाठी जीवाची पर्वा नकर्ता कर्तव्य पार पाडत आहे.
परीक्षाविधीन डिवायएसपी केदार बारबोले यांनी आपल्या मनोगतात अमळनेरकरानी एकमेकात सामाजिक सलोखा राखण्यासाठी एकीची कास धरावी.प्रगतीत यश संपादन करावे.
जळगाव मनियार बिरादारीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी मौलाना रियाज शेख यांच्या कार्याची स्तुती करीत देशात वक्फ बोर्डाचा विषय सुरु असूनही अंमळनेर मध्ये भाईचारा नांदताना दिसत आहे.
माजी आमदार डॉ बी एस पाटील यांनी मार्गदर्शनात सांगितले ईद निमित्ताने हिंदूं बांधवानी ईफतार पार्टीचे आयोजन केले पाहिजे होते. तेव्हाचं दोन समाजात खऱ्या अर्थाने भाईचारा निर्माण होईल.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुफ्ती जाहीद हुसेन यांनी स्वातंत्र सेनानी अल्लामा फजले हक खैराबादी स्टडी सर्कल अँड लायब्ररी चे अध्यक्ष मौलाना रियाज शेख हें सामाजिक सलोखा राखण्यासाठी करीत असलेल्या कार्याची स्तुती करीत स्वातंत्र सेनानी अल्लामा फजले हक खैराबादी यांच्या क्रांतीकारी कार्याची महती सांगून भारताला मुस्लिम व हिंदूंनी मिळून इंग्रजाना बाहेरचा रस्ता दाखविला असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला बौद्ध धर्मगुरू तेलंग,नपा मुख्याधिकारी तुषार नेरकर, आरोग्य अधिकारी संतोष बिऱ्हाडे, इंजि निकम,काँग्रेस च्या सुलोचना वाघ,प्रभारी पोलीस निरीक्षक निकम,भाजपा युवा मोर्चाचे महेंद्र पाटील,कामगार नेते सोमचंद संदानशीव,भागवत गुरुजी,नगरसेवक संतोष लोहरे, बबलू पाठक, अबू महाजन, श्रीराम चौधरी, प्रा डॉ राहुल निकम आदी मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड काजी केले तर आभार गौतम मोरे यांनी मानले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उदयोजक कुदरत अली,इकबाल कुरेशी, नाविद शेख,रिझवान मणियार,रियाज मौलाना,शेरखा पठान,शारुख सिंगर,अझहर अली,अल्तमश शेख,आकिब अली, हैदर मिस्त्री,फारुख खाटीक,आक्रम पाठाण यांनी परीक्षम घेतले.