माझा गुरु – माझी आई 🙏🏻 आईच्या स्मुर्तीना आदरांजली 🙏🏻

🙏🏻 *आईस विनम्र अभिवादन* 🙏🏻

*जिने मला पोटात नऊ महिने त्रास सहन करत जन्म दिला तसेच बोलण्यास बोट धरून चालायला शिकविले त्या प्रथम गुरूला माझ्या मातेला नतमस्तक होऊन विनम्र आदरांजली वाहतो.*

*माझी आई तशी अडानीच होती.त्याकाळी मुलींना शिकविणे हे डोक्याच्या बाहेरच होते.माझी आईला दोन भाऊ व पाच बहिणी.माझी आई भावंडात मोठी असल्याने घरातील जवळपास सर्वच कामे तिला करावी लागत.त्याकाळी गावातील इतर लोकांच्या घरातील गोठ्यातील गायी म्हशी चे शेन आवर सावर ची कामे ती आपल्या आई वडील यांच्या सोबत करत असे.मोबदल्यात शिळी भाकरी मिळत असल्याचे तिने आम्हां भावंडाना सांगत असे.*

*लहान वयातच तिचा विवाह माझ्या वडिलांशी झाला होता.माझे वडील मात्र त्यावेळीच मॅट्रिक होते.त्यामुळे त्यांना कोकणात शिक्षकाची नोकरी लागली.त्यामुळे वडिलांनी आईला नोकरीच्या गावी आणले.लहान वयातच तिला कुटुंबाची जबाबदारी स्विकारावी लागली.*

*माझा आई चे पहिले आपत्य म्हणजे माझी मोठी बहीण सुनेत्रा.तिला आम्ही सर्व बाई नावाने हाक मारतो.तिच्या नंतर अजून तीन मुली (विद्याताई, विजया ताई, छायाताई) झाल्या.मुलीच जन्माला येत असल्याने वडिलांनी तिला अनेकदा ऑपरेशन करून घे म्हणून सांगितले.मात्र तिला वंशाचा दिवा हवा होता.अखेर १५ जुलै १९७१ ला माझा जन्म झाला.माझ्या मामांनी माझे नाव वंशाला दिवा मिळाला म्हणून दिपक हे नाव ठेवले.तर वडिलांनी वंशाला दिवा मिळाला म्हणून विजय असे नाव ठेवले.माझ्या जन्मामुळे सगळ्यांना आनंद झाला.वडिलांनी परिसरात त्याकाळी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.मला भाऊ हवा म्हणून आई ने सहावे आपत्य जन्माला घातले मात्र त्यावेळी मला पुन्हा एक सुंदर अशी बहीण(मीना)आली.*

*मी घरात सर्वांचा लाडका होतो.माझ्या सर्वच बहिणी माझा तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ करीत होते.मी जन्माला आल्या नंतर घरातील कामांची जबाबदारी माझ्या मोठ्या बहिणींनी घेतली होती.आता मला सतत आईच्या मायेची ऊब मिळत होती.तिने मला प्रथम मामा हा शब्द बोलण्यास शिकवला.नंतर दादा हा शब्द. आम्ही आमच्या वडिलांना दादा नावाने हाक मारतो.आमचे दादा हे अगदी साधे सरळ विचारांचे होते.अंगात सफेद कुर्ता,लेंगा व डोक्यात टोपी घालूनच शाळेत जायचे.पंधरा वर्षे कोकणात नोकरी केल्यानंतर त्यांनी मुंबई च्या महानगर पालिका शाळेत शिक्षक म्हणून लागले. नंतर संपूर्ण नोकरी त्यांनी मुंबई मध्येच केली .मात्र टोपी,कुर्ता व लेंगा हा पेहराव सोडला नाही.साधी राहणी व उच्च विचार असल्याने विद्यार्थ्या सह अधिकारी,कर्मचारी यांच्यात प्रिय होते . त्यांनी कधीही व्यसन केले नाही .ते संस्कार माझ्या आई ने दिले.वडीलधारी लोकांचा सन्मान करावा,कोणालाही उलट उत्तर देऊ नये,नेहमी खरेच बोलावे,चांगल्या मित्रांशी संगत करावी,शाळेतील सर्व शिक्षकांचा आदर करावा,शाळेत पहिल्याच बाकावर बसावे,शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करावा,घरी दिलेला अभ्यास वेळीच करावा,असे अनेक चांगले संस्कार तिने माझ्या मनावर बिंबवले.ती नेहमी मला सांगायची की बाबासाहेब आंबेडकरांनी खूप अभ्यास केला म्हणून ते आपल्या लोकांसाठी महान कार्य करू शकले.तू ही चांगला शिक व आयुष्यात मोठा माणूस हो.*

*माझे प्राथमिक शिक्षण नगरपालिकेच्या शाळेत तर नंतरचे माध्यमिक विद्यालयात झाले.पुढील पदवी पर्यंत चे शिक्षण करण्यास आई वडील नेहमी प्रोत्साहन द्यायचे.माझ्या लग्नानंतर ही तिने मला पुढील शिक्षण घेण्यास प्रेरणा दिली.मला संस्कारी बनविण्यात माझ्या आईचा मोठा वाटा आहे.वडिलांचे पुण्यकर्मामुळे आज सुखी जीवन जगत आहे.*

*तिची खूप इच्छा होती की मी सुध्दा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखा डॉक्टर व्हावे.आज मी पीएचडी पदवी मिळवली मात्र ती आज हयात नाही.मागील तीन वर्षांपूर्वीच ती आम्हाला सोडून गेली.तिचे खाली पडणे हे निमित्त मात्र झाले.डोक्याला मार लागल्याने कोमात गेली.अवघ्या तीन दिवसात तिने प्राण सोडला. आम्हां कोणालाही त्रास नदेता पोरक करून गेली. आई ची छत्रछाया हरपली.माझा प्रथम गुरू मला बरोबर ५ सप्टेंबर रोजी अर्थात गुरू पौर्णिमेला अनंतात विलीन झाला.*

*तिने दिलेल्या सुसंस्काराची शिदोरी आज मी माझ्या दोघं मुलांना दिली. माझी मुलगी डॉ दिक्षिता उर्फ अंकिता व माझा सुसंस्कारि मुलगा सुगध उर्फ ओम तिने दिलेल्या आशीर्वादाने उच्च शिक्षण घेत आहे.*

*माझ्या आईला – माझ्या गुरूला दक्षिणा स्वरूपात मला मिळालेली पीएचडी पदवी आपल्या साक्षीने अर्पण करतो.*

 

*आई तुझी खूप खूप आठवण येते ग…….*

🙏🏻😔🌹😔🙏🏻

 

****** तुझाच दिपक *****

*प्रा डॉ विजय तुळसाबाई शालिग्राम गाढे*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!